Maharashtra Politics | वंचित आघाडीला महाविकास आघाडीत घेणार का?, शरद पवारांनी स्पष्ट सांगितले…

Prakash Ambedkar | ncp leader sharad pawar together with bjp say banchit bahujan aghadi leader prakash ambedkar
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | कसबा पोटनिवडणुकीच्या निकालावरुन (Pune Kasba Peth Bypoll Election Result) राजकीय वर्तुळात अद्यापही चर्चा सुरु आहे. मविआ आणि भाजप (BJP) तसेच शिंदे गटात आरोप प्रत्यारोप होत आहेत. या पोटनिवडणुकीत वंचित बहुनजन आघाडीने शिवसेना लढणार असेल तर पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर वंचित आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) मविआमध्ये समावेश होणार का, याबाबत चर्चा सुरु (Maharashtra Politics) झाली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांना विचारले असता त्यांनी मी या चर्चेत नसतो असे सांगितले.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) घेणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारला. त्यावर शरद पवार म्हणाले, मला याबद्दल माहीत नाही.कारण मी त्या चर्चेत नसतो. निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), काँग्रेस (Congress) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (Shivsena) यांनी एकत्रित निवडणूक लढवावी, अशी आमची विचारधारा आहे. शरद पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत (Maharashtra Politics) वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर
(Prakash Ambedkar) यांना विचारले असता, घोडा मैदान जवळ आहे. योग्य वेळी सर्व परिस्थिती समोर येईल.
मात्र एक गोष्ट मी याठिकाणी सांगू इच्छितो की, शिवसेना आणि वंचितची युती आहे.
उरलेल्यांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही.

Web Title :- Maharashtra Politics | sharad pawar statment over mavikas aghadi and vanchit bahujan aghadi alliance

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amrawati Crime News | व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीकडून महिलेकडे खंडणीची मागणी

Prakash Ambedkar | ‘कसब्यातील विजय धंगेकरांचा’, प्रकाश आंबेडकरांचे मत (व्हिडिओ)

Nashik Crime News | नाशिकमध्ये शेततळ्यात बुडून 12 वीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

Total
0
Shares
Related Posts