रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांचे भाऊ पंडित पाटील हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत (BJP) प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शेकापला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
माझ्या पक्ष प्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप एक नंबरला येणार असल्याचा दावादेखील पंडित पाटील यांनी केला आहे. रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून, त्याचा भाजपला मोठा फायदा होईल. शिवाय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीत पंडित पाटील काय आहे, ते इतरांना कळेल, असा इशारा त्यांनी जयंत पाटील यांना नाव न घेता दिला.
दरम्यान, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.