Maharashtra Politics | सोलापूरमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, संपूर्ण गट पुन्हा उद्धव ठाकरे गटात

0
397
Maharashtra Politics | shinde faction in akkalkot joins uddhav thackeray shivsena in solapur
File Photo

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) आणि शिंदे गटात (Shinde Group) रस्सीखेच सुरु आहे. राज्यातील अनेक कार्य़कर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र सोलापूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाला मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) सोलापूर उपजिल्हाप्रमुख मनोज पवार (Manoj Pawar) यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत (Uddhav Balasaheb Thackeray’s Shiv Sena) प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश करताना मनोज पवार यांनी शिंदे गटाच्या (Maharashtra Politics) नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

 

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील या नेत्याने आपल्या कार्य़कर्त्यांसह उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन (Maharashtra Politics) शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र हे कार्य़कर्ते आणि पदाधिकारी पुन्हा उद्धव ठाकरे गटात परतले आहेत. जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (District Chief Purushottam Barde) यांच्या उपस्थितीत मनोज पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटासह, मनसे (MNS), भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) अशा एकूण 21 जणांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला.

शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश केल्यावर मनोज पवार यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.
एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख हे एकदम निष्क्रिय माणूस आहे.
आपली पोळी शेकून घेण्यासाठी हे लोक शिंदे गटात गेले आहेत.
या सर्वांचे दोन नंबरचे धंदे आहेत.
ते सांभाळण्यासाठी तसेच सत्तेमुळे ते शिंदे गटात गेले.
शिंदे गट हा दोन वर्षे देखील टिकणार नाही.
यांची लवकरच माती होईल, अशा शब्दात पवार यांनी शिंदे गटावर घणाघात केला.

 

 

Web Title :- Maharashtra Politics | shinde faction in akkalkot joins uddhav thackeray shivsena in solapur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा