Maharashtra Politics | ‘पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष असावा, घरात बसून…’, शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) राहतील, असं खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पक्षाला पूर्णवेळ देणारा पक्षाध्यक्ष (Maharashtra Politics) असावा, घरात बसून पक्ष चालवणारा नसावा. संघटनेच्या कार्यकर्त्यांबद्दल स्नेहभाव आणि आपुलकी असावी. कार्यकर्त्यांना वेळ आणि पक्षबांधणी करणारा असावा. हे सर्व गुण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत, अशा शब्दांत गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त खासदार संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत (MLA Sunil Raut) यांची सामनामध्ये जाहीरात छापण्यात आली आहे. यामध्ये ‘साहेब मी गद्दार नाही, गेलेल्या 40 गद्दारांना गाडून त्याच उमेदीने उभे राहू. तेव्हाच खऱ्या अर्थाने अभिवादन केलं, त्याचं समाधान आमच्यासारख्या शिवसैनिकांना होईल’, असं लिहिलं आहे. यावर संजय गायकवाड म्हणाले, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीची (NCP) चमचेगिरी करुन संजय राऊत बाळासाहेबांना अभिवादन करु शकत नाहीत अशी टीका केली. (Maharashtra Politics)

 

गाडणारा जन्माला यायचा आहे

आम्ही गद्दार नाहीतर खुद्दार आहोत, हे वारंवार स्पष्ट केलं आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्याकडे आहेत.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सवंगड्यांना गाडणारा जन्माला यायचा आहे.
बाळासाहेबांचे विचार संजय राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखाली तुडवले आहेत. हे त्यांनी थांबवलं पाहिजे.
तेव्हाच ते बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करु शकतात, असंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.
ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

Web Title :- Maharashtra Politics | shinde group mla sanjay gaikwad attacks sanjay raut and uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा