Maharashtra Politics | आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात? चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाल्यावर शिवसेना शिंदे गट घेणार मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्षाचे नाव (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना देण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर राज्यातील राजकीय समिकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. शिंदे गटाने विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालय (Shiv Sena Party Office) ताब्यात घेतल्यानंतर आता शिंदे गटाने अधिवेशनाची (Maharashtra Politics) जोरदार तयारी सुरु केली आहे. लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) होणार आहे. या अधिवेशनासाठी व्हीप (Whip) जारी केला जाणार आहे. हा व्हीप आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना देखील लागू होणार असून जर त्यांनी व्हीप स्विकारला नाही तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. सर्व 56 शिवसेना आमदारांना (Shivsena MLA) हा व्हीप बजावला जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान हा व्हीप बजावला जाईल. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्याकडून हा व्हीप जारी केला जाणार आहे. हा व्हीप उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांना देखील लागू असणार आहे.

शिवसेनेच्या चिन्हावर जे आमदार निवडून आले आहेत त्या सर्व आमदारांना हा व्हीप लागू असणार आहे.
जर कुणी व्हीप पाळला नाही तर त्या आमदारावर अपात्रतेची कारवाई केली जाईल,
असा इशारा भरत गोगावले यांनी दिला आहे. यामुळे ठाकरे गटातील आमदार शिवसेना शिंदे गटाचा व्हीप पाळणार
की नाही यावरुन राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरदार
गाजणार आहे.

Web Title :- Maharashtra Politics | shinde group whip applied to aditya thackeray otherwise action will be taken

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहताच चाहतीने केले ‘हे’ कृत्य; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?