Maharashtra Politics | रामदास कदमांनी राज्यात फिरुन दाखवावं, शिवसेना नेत्याचा थेट इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिव संवाद यात्रेदरम्यान (Shivsamvad Yatra) दापोलीत (Dapoli) झालेल्या जाहीर सभेत रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यावर शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार टीका करण्यात आली होती. याच ठिकाणी रामदास कदम यांनी जाहीर सभा घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा (Maharashtra Politics) साधला होता. रामदास कदम हे ठाकरे कुटुंबियांवर (Thackeray Family) सतत टीका करत असल्याने राज्यातील शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाले आहेत. याचा एक भाग म्हणजे सुषमा अधारे (Sushma Andhare) यांनी कदम यांच्यावर टीका करुन त्यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 

रामदास कदम चिल्लर माणूस असून, राज्यात फिरु देणार नसल्याचा इशारा अंधारे यांनी दिला आहेत. याशिवाय शिवसेना नेत्यांनी तुमच्यावर टीका केली असेल पण तुमच्या कुटुंबावर कुणी घसरले नाही. तरीही तुम्ही वैयक्तिक पातळीवर घसरता? सरड्या पेक्षा जास्त वेगाने तुम्ही रंग बदलतायत. ज्या मराठवाड्यात (Marathwada) तुम्ही शिवसेना संपर्कप्रमुख होतात, त्याच मराठवाड्यातील लातूर आणि बीडमध्ये तुम्ही येऊन दाखवा, असा इशारा अंधारे यांनी रामदास कदम यांना दिला आहे. (Maharashtra Politics)

 

रामदास कदम यांच्यात अचानक एवढी ताकद आली कुठून. रामदास कदम एकदम निष्ठेची भाषा बोलू लागले आहेत.
ज्यांच्या मांडीवर जाऊन बसताय. तीच मंडळी तुमचा पगार किती, तुमची निष्ठा किती असा सवाल करत होते,
पण त्याकडेही तुम्ही लक्ष देत नाही, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.

 

दरम्यान, रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबावर केलेल्या टीकेच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन शिवसैनिकांकडून केले जात आहे.
रत्नागिरी, दापोली, रायगड, ठाणे यासह राज्यातील अनेक ठिकाणच्या शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नजीकच्या काळात रामदास कदम आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत.

 

Web Title :- Maharashtra Politics | shiv sena leader sushma andhare replied shinde group ramdas kadam about criticism on uddhav thackeray family

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lumpy Virus | पिंपरी चिंचवड शहरी भागात लम्पीचा शिरकाव, पाच जनावरांना प्रादुर्भाव; आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला आढावा

Beed ACB Trap | 1500 रुपये लाच घेताना सहायक सरकारी महिला वकील अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Maharashtra Politics | पत्राचाळ प्रकरणी अतुल भातखळकर यांचा गंभीर आरोप, म्हणाले – ‘शरद पवार हेच खरे रिंग मास्टर…’