Maharashtra Politics | राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर बंडखोर आमदार ‘शिवतीर्था’वर राज ठाकरेंच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Shivsena Rebel Leader Eknath Shinde) यांनी पक्षातून 50 आमदार फोडून भाजपाच्या (BJP) साथीने राज्यात सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. सत्तांतर नाट्यात सुरू असलेल्या वेगवान राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) आता थोड्या शांत होतील, असे वाटत असतानाच रोज नवीन काहीतरी घडत आहे. आज शिंदे गटातील एक आमदार मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी भेट घेण्यासाठी गेल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

 

नव्या सरकारच्या बहुमत चाचणीत मनसेच्या एका आमदाराने भाजपा आणि शिंदे गटाच्या बाजूने मतदान केले होते. ईडीच्या (ED) नोटीसीनंतर भाजपा आणि राज ठाकरे यांची वाढलेली जवळीक आता लपून राहिलेले नाही. त्यातच शिवसेना आणि काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीच (NCP) आपले खरे विरोधक अशी भूमिका घेतलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीला शिवसेनेचे बंडखोर आमदार गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले दादरचे आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) आज सकाळी ’शिवतीर्थ’वर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (Brihanmumbai Municipal Corporation Election) शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपा मनसेची मदत घेण्याची राजकीय खेळी (Maharashtra Politics) करू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आजच्या या भेटीतून हेच संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे.

 

शिवसेनेने सदा सरवणकर यांचे तिकीट कापून आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांना दिल्याने ते नाराज होते.
पण 2019 च्या निवडणुकीत संधी मिळून आमदार झालेले सदा सरवणकर शिंदे गटात गेले आहेत.
आज ते राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | shiv sena mla sada sarvankar meet mns chief raj thackeray

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा