Maharashtra Politics | शिवसेनेची नवीन टॅगलाईन! ‘बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Elections) सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. असे असले तरी शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) या दोन पक्षांमध्येच थेट लढत होण्याची शक्यता आहे. भाजपने कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे समजून कामाला लागा. तर दुसरीकडे शिवसेनेनेही (Maharashtra Politics)  आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) ‘बदला सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा!’ असा नवा नारा शिवसेनेने दिला आहे.

 

शिवसेनेच्या या नव्या नाऱ्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेने या आधी देखील टॅग लाईनच्या (Tagline) माध्यमातून विरोधकांना जेरीस आणल्याचं पहायला मिळाले आहे. नुकतेच 40 बंडखोर आमदारांना (Rebel MLA) पन्नास खोके एकद ओके, गद्दारांना माफी नाही, अशा घोषणा आणि फ्लेक्स पहाला मिळाले हेते. शिवसेनेने कायम टॅग लाईनची मदत आपल्या प्रचारासाठी आणि विरोधकांवर टीकेसाठी घेतली आहे. (Maharashtra Politics)

 

मागील निवडणुकीत ‘करुन दाखवलं’ ही टॅग लाईन तर आता आगामी निवडणुकीत ‘बदला सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा!’
ही टॅगलाईन घेऊन शिवसेना निवडणुकीला सामोरे जाताना पाहायला मिळत आहे.
आमदारांनी बंड केल्याने मुंबई पालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना तगडे आव्हान देण्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने (Shinde Group) कंबर कसली आहे.
तर दुसरीकडे पक्ष वाचवण्याचे नवे आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर आहे.
त्यामुळे यंदाची मुंबई महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे यांना सोपी नाही.

 

Web Title :- Maharashtra Politics | shiv-sena-new-tagline-for-next-bmc-election- uddhav thackeray cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

Maharashtra Politics | पक्षात बंडखोरी करणार्‍या शिंदे गटाची पक्षप्रमुखांनाच ऑफर; उद्धव ठाकरेंचे स्वागतच करू, पण अट एकच…