Maharashtra Politics | संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे, म्हणून ते…, शिंदे गटाचे टिकास्त्र

Maharashtra Politics | shiv sena shinde group naresh mhaske criticised sanjay shinde over statement about uddhav thackeray pm post candidate
file photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election-2024) भाजपचा (BJP) पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र यावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलं आहे. यातच संजय राऊतांनी (MP Sanjay Raut) उद्धव ठाकरे पंतप्रधानपदासाठी (Maharashtra Politics) उत्तम चेहरा असल्याचे म्हटले होते. यावरुन शिंदे गटाच्या नेत्यांकडून संजय राऊतांवर टीका होत आहेत. आता शिंदे गाटेचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

विरोधी पक्षामध्ये जे प्रमुख चेहरे आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे हे महत्त्वाचा चेहरा वाटतो. कारण महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे. ते ठाकरे आहेत, हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. राजकारणात काहीही घडू शकते. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी (Maharashtra Politics) उत्तम चेहरा असल्याचे संजय राऊतांनी म्हटले होते. यावर नरेश म्हस्के प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे

संजय राऊतांना मातोश्रीच्या गुडबुकमध्ये राहायचे आहे त्यामुळे त सत्ताधाऱ्यावर टीका करत असतात. ज्या लोकांना आपले 40 आमदार (MLA) आणि 13 खासदार सांभाळता आले नाहीत. ज्या प्रमाणे नेते त्यांना सांभाळता आले नाहीत, त्यांना पक्षही सांभाळता आला नाही. राजकारणातील सत्तापिपासू वृत्तीमुळे आणि मुख्यमंत्री पदासाठी आपली ज्यांनी आपले विचार सोडले आणि काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांसोबत जाऊन बसले ते देश काय सांभाळणार, अशा शब्दात नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासमोर उद्धव ठाकरे यांचा चेहरा असूच शकत नाही आणि मोदींसमोर ते टक्कर देऊ शकत नाही, असेही म्हस्के यांनी म्हटले.

राऊतांच्या डोक्यावर परिणाम झालाय

दरम्यान, संजय राऊतांच्या विधानावर (Maharashtra Politics) शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट
(Shinde Group MLA Sanjay Shirsat) यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
संजय राऊत हे रोज काही ना काही नवीन विधान करत असतात. हा त्यांचा छंद आहे.
उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करणारे संजय राऊत कोण आहेत? मुळात संजय राऊत हा एक कारकून आहे.
तो काय उद्धव ठाकरेंची उमेदवारी जाहीर करेल. याबाबत उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीतील जे महत्त्वाचे
नेते आहेत, ते ठरवतील. मला पूर्ण विश्वास आहे की संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.
त्यामुळेच तो नको ती बडबड करतो, असे शिरसाट म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

Web Title : Maharashtra Politics | shiv sena shinde group naresh mhaske criticised sanjay shinde over statement about uddhav thackeray pm post candidate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘काही लोक 365 दिवस शिमगा करतात, मला त्यांना एवढंच सांगायचंय…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pune Pimpri Chinchwad Crime | प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दिघीतील घटना; दोन सख्ख्या भावांना अटक

Total
0
Shares
Related Posts
Khadki Pune Crime News | Beat the driver and took the cab away! Two rickshaws, a car and a pedestrian were hit on the way

Pune Crime News | पुणे : धर्मांतराचा कट? ब्लेसिंग ऑईल, प्रभूची गाणी आणि डान्स करुन बरे होत असल्याचे सांगणाऱ्या पास्टर व सिस्टरवर जादुटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | Pimpri Municipal Corporation owes Rs 7 crore 55 lakh to the police; The topic of discussion in the city; Property on Lease for Police Station, Chowki with Commissionerate

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) | पिंपरी महापालिकेची पोलिसांकडे 7 कोटी 55 लाख रुपयांची थकबाकी; शहरात ठरतोय चर्चेचा विषय; आयुक्तालयासह पोलीस ठाणे, चौकीसाठी मालमत्ता भाडेतत्वावर