Maharashtra Politics | ‘छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली’ भाजपा नेत्याचं मोठं विधान, जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले-‘ असं बोलणारा भाजप प्रवक्ता…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (Swatantryaveer Savarkar) ब्रिटिशांची माफी मागितल्याच्या मुद्यावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी नुकतेच भारत जोडो यात्रे (Bharat Jodo Yatra) दरम्यान सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. सावरकरांनी ब्रिटिशांची (British) माफी मागितली होती, ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असे विधान राहुल गांधी यांनी केले. यावरुन महाराष्ट्रातील नेत्यांकडून (Maharashtra Politics) निषेध केला जात आहे. हे प्रकरण ताजं असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.

 

राज्यपालांनतर भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (BJP Spokesperson Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबला (Aurangzeb) पत्र लिहिलं होतं. त्या काळात राजकीय अडचणीतून बाहेर येण्यासाठी अनेक लोक माफीनामा लिहायचे असं विधान त्रिवेदी यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा हा व्हिडिओ शेअर करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, शिवाजी महाराजांनी पाच वेळा औरंगजेबाची पत्र लिहून माफी मागितली होती, असं बोलणारा भाजप प्रवक्ता वेडाच असू शकतो.

काय म्हणाले सुधांशु त्रिवेदी ?
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी म्हणाले, सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोक प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावरकरांनी ब्रिटिश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती, असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केले आहे. (Maharashtra Politics)

 

काय म्हणाले राज्यपाल?
औरंगाबाद मधील एका कार्यक्रमात बोलताना कोश्यारी म्हणाले, आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो,
तेव्हा आणचे शिक्षक आम्हाला विचारायचे की तुमचे आवडते नेते कोण? मग ज्यांना सुभाषचंद्र बोस (Subhas Chandra Bose) चांगले वाटायचे,
ज्यांना नेहरू (Jawaharlal Nehru) चांगले वाटायचे, ज्यांना गांधीजी (Mahatma Gandhi) चांगले वाटायचे ते त्या त्या व्यक्तींची नाव घ्यायचे.
मला असं वाटतं की जर कुणी तुम्हाला विचारलं की, तुमचे आवडते हिरो किंवा आदर्श कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही.
इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय.
डॉक्टर आंबेडकरांपासून (Dr. Babasaheb Ambedkar) डॉ. नितीन गडकरींपर्यंत (Dr. Nitin Gadkari) सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Politics | shivaji maharaj apologized to aurangzeb five times via writing letter jitendra awhad on bjp sudhanshu trivedi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Politics | विचार सोडून आमच्यासोबत या म्हटलं नव्हतं, काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना सुनावलं

MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील

Pune Pimpri Crime | घराशेजारी राहणाऱ्या महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवून विनयभंग, पिंपरी चिंचवड परिसरातील घटना