Maharashtra Politics | पेंग्विनने खुप प्रसिद्धी दिली…तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला

मुंबई : Maharashtra Politics | पेंग्विन म्हटल्याचा मला अभिमान आहे. मी जेव्हा पेंग्विन मुंबईत आणले. ते पाहण्यास मोठ्या संख्येने लोक आले होते आणि त्याला खुप प्रसिद्धी मिळाली. तुम्ही पेंग्विन सेना बोलत राहा, आम्ही अशी अनेक काम केली आहेत. त्याबद्दलही बोलत राहा. कोस्टल रोड सेना, असेही म्हणू शकता, असा टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी (Shivsena Leader Aditya Thackeray) भाजपा (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) लगावला आहे. (Maharashtra Politics)

शिंदे गटावर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, खोके सरकारने टीका करणे, हेच हास्यास्पद झालेले आहे. वेदांताचा प्रकल्प (Vedanta Project) राज्यातून गेला आणि हे त्यांच्या सरकारच्या काळात झाले आहे. सरकारच घटनाबाह्य बनवले आहे. त्यामुळे हे झाले आहे. देशभरातील शिवसैनिकाची (Shiv Sainik) यंदाच्या मेळाव्याबाबत उत्सुकता वाढली आहे.

रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आदित्य म्हणाले, मी त्यांच्यावर कधी बोलतच नाही. माझ्यावर चांगले संस्कार झाले आहेत. चांगल्या गोष्टीबाबत बोलावे. वेडेवाकडे जो आरोप करतो, त्याच्यावर कधीच बोलू नये. (Maharashtra Politics)

ठाणे शहरातील टेंभी नाक्यावर देवीच्या दर्शनाला जाण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले,
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असतील, मी असेन, आम्ही तिथे वर्षानुवर्ष दर्शनाला गेलेलो आहोत.
त्याचप्रमाणे रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी टेंभी नाक्यावर जाऊन दर्शन घेतले आहे.

Web Title :- Maharashtra Politics | shivsena leader aaditya thackeray replied opposition over taunts him as penguin

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Eng vs Pak | इंग्लंड-पाकिस्तान सामन्यात बॉल लागल्यामुळे भर मैदानात कळवळला अम्पायर, Video आला समोर

Gulabrao Patil | ज्या दिवशी धनुष्यबाण आपल्याकडे येईल…, गुलाबराव पाटलांचा शिवसेनेला गंभीर इशारा