Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीसांना सनसनाटी निर्माण करायची सवय, फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत केला होता. यावर माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. (Maharashtra Politics) फडणवीस यांना सनसनाटी निर्माण करण्याचा छंद आहे. फडणवीस आधी असे नव्हते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचीच (CM) ऑफर दिली होती. आज उपमुख्यमंत्री आहात, किती दिवस राहतील बघू, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

संजय राऊत पुढे म्हणाले, तेव्हाचे देवेंद्र फडणवीस आणि आताचे फडणवीस यामध्ये खूप फरक दिसत आहे. त्यांना आता स्टंटबाजी करण्याची काय गरज आहे, कळत नाही. महाराष्ट्रात राजकीय घडामोडी (Maharashtra Politics) घडत असताना, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदावरुन राजीनामा देऊन जात होते, त्यावेळी विरोधी पक्षांसोबत बोलले असतील. पण, इतक्या दिवसांनी ते बोलून सनसनाटी निर्माण करण्याची गरज काय होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती ना. आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात, आता किती काळ उपमुख्यमंत्री राहाल ते सांगता येत नाही, शेवटी दिल्लीची मर्जी आहे. इन्जॉय करा, असे राऊत म्हणाले.

पोलीस राजकीय एजंट बनून…

कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) भाजपने (BJP) पोलिसांच्या
(Pune Police) मदतीने पैसे वाटप केल्याचा आरोप काँग्रेसचे रविंद्र धंगेकर
(Congress Ravindra Dhangekar) यांनी केला आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले,
महाराष्ट्रात अनेक काळापासून निवडणुकीत पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप केले जात आहेत.
मागच्या निवडणुकीत सुद्धा पोलिसांच्या मदतीने पैसे वाटल्याचे पुरावे समोर आले आहेत.
पोलीस राजकीय एजंट बनून पैसे वाटत असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.
धंगेकर यांनी आरोप केले असतील तर त्यांच्याकडे याचे पुरावे असतील असेही राऊत म्हणाले.

Web Title :-  Maharashtra Politics | shivsena mp sanjay raut criticism on deputy chief minister devendra fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sambhajinagar | औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! केंद्र सरकारची मंजुरी; देवेंद्र फडणवीसांनी केलं ‘हे’ ट्विट

Kili Paul | भोजपुरी गाण्यावर ठुमके देत किली पॉलने केली मोठी घोषणा ; म्हणाला “मी लवकरच हिंदी…..”

Pune ACB Trap | जलसंपदा विभागाचा उपविभागीय अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; ७ लाखांची लाच मागून साडेतीन लाख घेताना…