Maharashtra Politics | दिवा विझताना तेजोमय होतोच; भाजप-मनसे-शिंदे गटाच्या संभाव्य महायुतीला शिवसेनेचा टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | मनसेने शिवाजी पार्कवर (Shivaji Park) आयोजित केलेल्या दिपोत्सव (MNS Dipotsav) कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे तीन पक्ष शिवसेनेविरोधात एकत्र येण्याची शक्यता (Maharashtra Politics) वर्तवली जात आहे. यावरून शिवसेनेने (Shivsena) राज ठाकरेंसह भाजप आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदार संघावर भाजपाचा (BJP) डोळा असून येथे दिवाळीनिमित्त भाजपाने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. यावरून शिवसेनचे सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी भाजप, मनसे आणि शिंदे गटावर टीका केली आहे.

भाजप-मनसे-शिंदे गटावर टीका करताना सुनील शिंदे यांनी म्हटले की, दिवा जेव्हा तेजोमय होतो,
तेव्हा तो विझण्याच्या तयारीत असतो. अशावेळी कोण कोणाला आधार देऊन मोठे करत आहे.
बुडत्याला काडीचा आधार अशी स्थिती आहे. मात्र महाराष्ट्र (Maharashtra Politics) आणि मुंबईच्या जनतेला हे चांगले माहिती आहे.
जनता योग्य वेळी उत्तर देईल.

सुनील शिंदे यांनी इशारा देताना म्हटले की, राज्यात सध्या अनेक समस्या आहेत.
त्या समस्या कशा सोडायच्या याचा दृष्टीकोन सध्याच्या सरकारकडे नाही.
ते केवळ वरळी मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत.
यावरून त्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे काम किती मोठे असावे याची कल्पना येते.
आम्ही फक्त आता निवडणुकीची वाट पाहात आहोत. निवडणुकीत दाखवून देऊ.

Web Title :- Maharashtra Politics | shivsena uddhav balasaheb thackeray group leader sunil shinde taut raj thackeray over mns bjp and shinde group maha yuti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | आगामी महापालिका निवडणुक भाजप-शिंदे गट युतीकरुन लढवणार?, देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले…

Shanikrupa Heartcare Centre | विना शस्त्रक्रिया हृदयविकार उपचार म्हणजे EECP थेरेपी, शनिकृपा हार्टकेअर सेंटरमध्ये EECP थेरेपी अल्पदरात उपलब्ध