Maharashtra Politics | चर्चा तर होणारच! श्रीकांत शिंदे, इम्तियाज जलील एकाच मंचावर; शिंदे म्हणाले ‘आम्ही तर…’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राजकारणात कोणीच कोणाचा मित्र नसतो तसा शत्रू देखील नसतो. याचा प्रत्यय औरंगाबादमध्ये (Maharashtra Politics) आला. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Aurangabad MP Imtiaz Jalil) आणि शिंदे गटाचे खासदार (Shinde Group MP) श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फेस्टिव्हलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे उपस्थित होते. त्यावेळी जलील देखील त्यांच्यासोबत होते. या दोघांनी क्रिकेट सामन्याचा आनंद देखील लुटला.

काही महिन्यांपूर्वी हिंदुत्वाचा (Hindutva) मुद्दा पुढे करत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केले. यानंतर शिवसेनेतील आमदारांनी आणि खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यासोबत केलेल्या युतीवरुन शिंदे गटाकडून ठाकरे गटावर (Thackeray Group) टीका सुरु आहे. याच दरम्यान श्रीकांत शिंदे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील हे एकाच मंचावर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्यक्रमात शिंदे यांनी जलील यांच्या गळ्यात हात घालून भाषण देखील केले. दोन कट्टर विरोधक एकाच मंचावर आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत

या भेटीवर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही मित्र आहोत.
हा कुठल्या पक्षाचा मंच नाही. दोघांचा पक्ष आणि विचारसरणी वेगळी आहे.
प्रत्येक गोष्टीत पक्ष आणण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाची (Maharashtra Politics)
ही संस्कृती आहे. राजकारण एका ठिकाणी आणि मैत्री वेगळ्या ठिकाणी, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटले.

Web Title :- Maharashtra Politics | shrikant eknath shinde and aurangabad mim mp Imtiaz Jalil on the same platform heated discussion of the meeting

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘हर हर महादेव’ चित्रपटावरुन राजकीय आखाडा तापला ! देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी आणि संभाजी ब्रिगेडला दिला थेट इशारा (व्हिडिओ)

Rishabh Pant | स्टेडियम मध्ये टवाळ प्रेक्षकांनी ऋषभ पंतला उर्वशीच्या नावाने डिवचलं अन्…