Maharashtra Politics | आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे गट आणि राष्ट्रवादीतील मतभेद उघड; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा आव्हाडांच्या वक्तव्याला विरोध

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वक्तव्य केले होते. त्यावरून सत्ताधाऱ्यांनी अजित पवारांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजितदादांच्या वक्तव्याबाबत त्यांची पाठराखन केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी काही पुस्तकांची पाने ट्वीट केली होती. तसेच औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता आणि तो क्रूर नव्हता असे वक्तव्य केले होते. त्यावर आता ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra Politics)

त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा होता. त्यांनी धर्मवीर संभाजीराजेंना हालहाल करून मारले. औरंगजेब क्रूर होता. जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मला माहित नाही, असं म्हणत अंबादास दानवे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आमचे विचार वेगवेगळे आहेत. आमचे विचार एकच आहेत असे कोणी सांगितलेले नाही. पक्षाचे सुध्दा विचार वेगवेगळे असतात. ज्याचा त्याचा विचार आहे, असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर असमर्थता दर्शविली.

अजित पवार यांनी युगपुरूष म्हटले हे चुकीचे नाही. जे युगपुरूष असतात तेच धर्मवीर असतात. औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा होताच, असही यावेळी बोलताना अंबादास दानवे यांनी ठणकावून सांगितले. (Maharashtra Politics)

दरम्यान, अजित पवार यांनी माफी मागावी अशी मागणी करणाऱ्यांनी सावरकर आणि गोळवलकर चुकलेत,
त्याबद्दल आधी माफी मागा, असा घणाघात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांवर केला.
आमचे राजे काय स्त्रीलंपट होते का? असा सवाल करत शिवपुत्र संभाजी राजे यांना स्त्रीलंपट आणि दारूड्या
म्हणणाऱ्यांना आपण आपले आदर्श मानत आहात त्याबद्दल आपले काय म्हणणे आहे?
हे या टीका करणाऱ्यांनी सांगावे. असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय जनता
पक्षाला दिले आहे. तसेच कमी माहितीच्या आधारावर आपण जेव्हा एखाद्याला कोंडीत पकडायला जातो,
तेव्हा तो कोंडीत पकडला जात नाही तर, इतिहासाची पाने बाहेर येतात.
जर सगळं काही शांत असतं तर आम्ही सुध्दा गोळवलकर आणि सावरकर यांची ही पाने बाहेर काढलीच नसती.
अशा शब्दात जितेंद्र आव्हाडांनी भाजपला टोला लगावला.

Web Title :-  Maharashtra Politics | thackeray group and ncps differences revealed jitendra awhads statement was opposed by the ambadas danve leader of the thackeray group

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mahavitaran Strike | संपाच्या 72 तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्था पूर्णत्वास ; पुणे परिमंडलामध्ये पर्यायी मनुष्यबळाद्वारे 24 तास सेवा राहणार

Maharashtra Politics | मोदींनी नारायण राणेंना चांगलेच खडसावले; ठाकरे गटातील ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

MP Amol Kolhe | छत्रपती संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ की ‘धर्मवीर’?, खा. अमोल कोल्हेंनी स्पष्ट केली भूमिका (व्हिडीओ)