Maharashtra Politics | मनसेच्या दिपोत्सवात नव्या युतीचा दीप? आजच्या कार्यक्रमात ठाकरे-शिंदे-फडणवीस एकाच व्यासपीठावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics |  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC Election) राजकीय पक्षांची चढाओढ लागली असून यंदाचे दिवाळी पहाट (Diwali Pahat) कार्यक्रम ठिकठिकाणी दणक्यात साजरे करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात देखील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपा (BJP) सत्तेत आल्यापासून मुंबई महापालिका (Maharashtra Politics) नजरेसमोर ठेवून काम करत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेला (MNS) सुद्धा आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

भाजपाच्या नेत्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या निवासस्थानी जाऊन आजपर्यंत अनेकदा भेट घेतली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकादा मनसे, भाजपा आणि शिंदे गट एकत्र येणार का, अशी चर्चा (Maharashtra Politics) सुरू झाली आहे. कारण, आज मनसेच्या दिपोत्सवानिमित्त ठाकरे, शिंदे, फडणवीस यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित करण्यात आले असून यानिमित्ताने ठाकरे-शिंदे-फडणवीस हे नेते एकत्र येत आहेत.

मुंबईतील दादर येथे मनसेकडून दरवर्षी दिपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षी या दिपोत्सवाच्या उद्धाटन सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आमंत्रित करण्यात आले असल्याने प्रथमच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येत आहेत. ही महापालिका निवडणुकीसाठी नांदी ठरू शकते. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज ठाकरे यांनी या कार्यक्रमाच्या पत्रकात म्हटले आहे की, माझ्या शिवाजी पार्क (Shivaji Park) शेजार्‍यांनो, तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो, दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय.

दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ’दीपोत्सव’  हे गेल्या 10 वर्षांपासून जणू समीकरणच बनले आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यावर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या 2 वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचे  निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.

दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो.
दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या
सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणार्‍या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून
टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर
ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल.

हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे. वसुबारसेपासून, 21 ऑक्टोबर 2022 पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत,
8 नोव्हेबंर 2022 पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे 21 ऑक्टोबरला,
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं
उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या.

मित्रमंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही.
त्यात जितके आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो.
तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा, असे निमंत्रण राज ठाकरे यांनी मुंबईकरांना दिले आहे.

Web Title :-  Maharashtra Politics | the beginning of a new political alliance mns raj thackeray eknath shinde devendra fadnavis to come together for diwali programme

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | कोंढवा पोलिस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकासह कर्मचारी 50 हजारच्या लाचप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘जाळयात’, प्रचंड खळबळ

Maharashtra IPS Transfer | मुख्यमंत्री, उपमुख्यंमत्री यांच्यातील मतभेदामुळे पदस्थापनेत 19 SP, डीसीपींना (DCP) फटका?, राज्य पोलीस दलात चर्चा

Pune Crime | चेंबर साफ करण्यासाठी उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू, वाघोली परीसरातील घटना

Eknath Khadse | फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला यांची सुटका झाल्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले- ‘अलीकडच्या काळात…’