Maharashtra Politics | राज्यात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मविआ’ला मिळू शकते घवघवीत यश; एका सर्वेच्या अहवालात ‘ही’ बाब उघड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | राज्यात महाविकास आघाडीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (General Elections 2024) घवघवीत यश मिळू शकते असे नुकत्याच एका संस्थेमार्फत केल्या गेलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. तसेच यावेळी या संस्थेने केंद्रात कुणाची सत्ता येईल याबाबतचा देखील अहवाल सादर केला. इंडिया टुडे आणि सी वोटर (India Today and Sea Voter Survey) यांनी एकत्र हा सर्वे केला. यात एकूण १ लाख ४० हजार ९१७ लोकांनी आपला सहभाग नोंदविला. (Maharashtra Politics)

या सर्वेमध्ये लोकांना विचारण्यात आले होते की, आज लोकसभा निवडणुक झाल्यास देशात कुणाची सत्ता येईल? त्यावर पुन्हा एकदा देशात भाजपचीच सत्ता येईल. असा कौल या सर्वेत सहभागी झालेल्या जनतेने दिला. गेली ९ वर्षे मोदी सरकार सत्तेत आहे. त्यावर ६७ टक्के लोकांनी त्यावर समाधान व्यक्त केले. २०२२ साली झालेल्या सर्वेच्या तुलनेत या आकडेवारीत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२२ साली करण्यात आलेल्या सर्वेत ३७ टक्के लोक मोदी सरकारच्या कामगिरीवर नाराज होते. आता हे प्रमाण १८ टक्क्यांनी घटले आहे.

या सर्वेत म्हटले आहे की, लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी एनडीएला (NDA) २९८ जागा मिळतील तर यूपीएला (UPA) १५३ जागा मिळतील. राज्यांचा विचार करता एनडीएला आसाम, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्यात मोठा फायदा होऊ शकतो. तर युपीएला कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहार या ३ राज्यात फायदा होईल. असं या सर्वेत म्हटलं गेलं आहे.

दरम्यान, २०२४ लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून (Maharashtra Politics) यूपीएला ३४ जागा मिळतील.
असे सर्वेत नमूद केले आहे. २०१९ च्या निवडणुकीत यूपीएने ६ जागांवर विजय मिळवला होता.
काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षासोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
यांनी भाजपसोबत (BJP) राज्यात सत्ता स्थापन केली होती.
त्यानंतर घेण्यात आलेल्या या सर्वेत भाजपला १४ जागा मिळू शकतात असे म्हटले आहे.
त्यामुळे मूड ऑफ नेशनच्या या सर्वेमुळे भाजपचे टेन्शन वाढले आहे.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणुन लढताना भाजप आणि शिवसेनेने (Shivsena)
एकूण ४१ जागांवर विजय संपादित केला होता. त्यात भाजपला २३ तर शिवसेनेला १८ जागा राज्यात मिळाल्या
होत्या. मात्र या सर्वेनुसार एनडीए महाराष्ट्रात मागील निवडणुकीच्या तुलनेत ४१ जागांवरून थेट १४ जागांवर येईल.
असे म्हटले आहे.

या सर्वेनुसार यूपीएला महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि बिहार या दोन राज्यांमध्ये देखील मोठा फायदा होऊ शकतो.
असे म्हटले आहे. कर्नाटक मध्ये १७ तर बिहारमध्ये २५ जागा यूपीएला मिळू शकतात.
असे देखील या सर्वेत म्हटले आहे.

Web Title :- Maharashtra Politics | the bjp shinde group can get a bump in the maharashtra state upa will get 34 seats loksabha elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | नाशिक पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय निश्चित – छगन भुजबळ

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

Pune Crime News | ‘तुला मॉडर्न मुलीसारखे राहता येत नाही, तू लो स्टँडर्ड आहेस’ असे म्हणत पत्नीचा छळ, जर्मनीत राहणाऱ्या पतीविरोधात पुण्यात FIR