Maharashtra Politics | PM नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप-शिंदे गटाची संयुक्त बैठक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | काल (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर आले असता त्यांच्या हातून मुंबईतील विविध विकासकामांचे भूमीपुजन तसेच उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधानांचा हा दौरा मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी चालल्या असल्याची चर्चा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता भाजप (BJP) आणि शिंदे गटात (Shivsena Shinde Faction) आज दि.२० एक महत्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली आहे. त्यात दोन्ही पक्षातील असणाऱ्या अंतर्गत कलहाबद्दल बोलले जाण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर प्रथमच उभय पक्षांची संयुक्तिक बैठक होत आहे. अशी माहिती जाणकारांनी दिली. (Maharashtra Politics)

 

भाजपने पाठिंबा दिल्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. सध्या शिवसेनेचा शिंदे गट आणि भाजप हे दोन्ही पक्ष राज्यात सत्तेत आहेत. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडी असल्याचे बोलले जात आहे. तशा बातम्या देखील काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. अखेर हा वाद मिटविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. काल (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले, आणि आज दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक आयोजीत करण्यात आली.  (Maharashtra Politics)

सत्तांतरानंतर भाजप-शिंदे गटाची ही पहिलीच संयुक्त बैठक आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासोबतच दोन्ही पक्षांचे सर्व आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीनंतर शिंदे गट व भाजपचे कार्यकर्ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागणार असल्याचेही बोलले जात आहे. यावेळी मुंबई महापालिका Brihanmumbai Municipal Corporation (BMC) निवडणुकीवर दोन्ही पक्षांकडून काही निर्णय घेतला जाणार का? याकडे देखील लक्ष लागले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | today joint meeting of shinde group and bjp discussion on bmc elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा