Maharashtra Politics | चिन्ह आणि नाव गेल्यावर अजित पवारांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, म्हणाले – ‘लवकरात लवकर…’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | शिवसेना (Shivsena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटला (Shinde Group) मिळाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एककीडकडे पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने शिंदे गटात उत्साह आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया (Maharashtra Politics) येत आहेत. याच दरम्यान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना सल्ला दिला आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निकाला विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जावे. त्या ठिकाणी न्याय मागावा असा सल्ला त्यांनी दिला. तसेच आम्हाला आशा आहे की न्यायदेवता निश्चित या प्रकरणात योग्य तो न्याय करेल असा विश्वास देखील अजित पवार यांनी बोलून दाखवला.

अजित पवार यांनी रविवारी (दि.19) बारामती येथील विकास कामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी आढावा बैठक घेतली. आढावा बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अजित पवार म्हणाले, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक निवडणुका लढवल्या. अनेकांना त्यांनी आमदार, खासदार, मंत्री केले. मविआमध्ये शिवसेनेसह इतर मित्र पक्ष आहेत. आघाडीत कम करत असताना आम्ही एकोप्याने काम करतो. जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.(Maharashtra Politics)

मी याबाबत अज्ञानी आहे

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले आहेत. दोन हजार कोटी रुपये घेऊन पक्षाचे नाव आणि चिन्ह दिल्याचे राऊत म्हणाले. यावर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मी याबाबत अज्ञानी आहे. मला हे माहिती नाही. मात्र एक जबाबदार खासदार असे वक्तव्य करत असेल तर सभागृहात आम्ही आमदार व खासदार काही भूमिका मांडली तर ते खरं समजून पुढे जायचे असा सभागृहाचा नियम असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर द्यायला बांधील नाही

कोणीही काहीही आरोप केले तरी त्याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही.
त्यांच्या आरोपांना देखील आम्ही फारसे महत्व देत नाही.
पवार साहेब कृषी मंत्री असताना हीच खासदार मंडळी आपली वेगवेगळी कामे घेऊन येत होती.
महाराष्ट्रातील खासदारांना दिल्लीत शरद पवार (Sharad Pawar) हे आधार वाटत होती.
त्या काळातील त्यांची वक्तव्य काढून पाहिली तर तुम्हाला समजेल ते काय म्हणत होते,
अशा शब्दात खासदार प्रताप जाधव (MP Pratap Jadhav) यांच्या शरद पवार यांच्यावरील टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले.

Web Title :- Maharashtra Politics | uddhav thackeray should go to supreme court at the earliest ajit pawar opinion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kiran Mane | शिवजयंती निमित्त किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत; म्हणाले ‘सच्च्या शिवभक्ताला कुठलीबी लढाई..’

Subodh Bhave | ‘ताज: डिव्हायडेड बाय ब्लड’ या हिंदी वेब सिरीज मधील बिरबलच्या भूमिकेतील सुबोध भावे यांचा लुक व्हायरल; लुकवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

Aurangabad Accident News | शिंदे गटाच्या आमदाराला सुरक्षा पुरवण्यासाठी जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा भीषण अपघात, 5 जण जखमी