Maharashtra Politics | ‘अजित पवार यांना विरोधी पक्षनेतेपद धमकीमुळे मिळालं’ केंद्रीय मंत्र्याच्या दाव्याने खळबळ

कराड : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | शरद पवार (Sharad Pawar) यांचा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर विश्वास नसून अजित पवार यांना विरोधीपक्षनेतेपद हे धमकीमुळे मिळाले. असा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा (Ajaykumar Mishra) यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी राज्यातील लोकसभा मतदार संघात ते बैठका घेत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज (दि. १८) कराड येथे आले असता त्यांनी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. (Maharashtra Politics)

अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना भाजप दबावतंत्राचा वापर करत आहे. असा आरोप त्यांनी भाजपवर केला होता. त्यावर आज (दि.१८) साताऱ्यातील कराड येथे बोलताना केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यावर विविध लोकसभा मतदार संघात जाऊन पक्षाच्या स्थितीविषयी व आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेत आहेत. त्याचाच भाग म्हणून आज कराड येथे आले असता केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. (Maharashtra Politics)

दरम्यान, काल (दि.१७) झालेल्या केंद्रीय भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा
यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढविण्यात आला. जगतप्रकाश नड्डा हे आता २०२४ पर्यंत भाजपचे अध्यक्ष राहतील.
या बैठकीस स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah),
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) आणि इतर केंद्रीय नेते तसेच विविध राज्यांतील भाजपचे
पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना चित्रपटांवर भाष्य टाळावे.
असा सल्ला पक्षातील नेत्यांना दिला.

Web Title :- Maharashtra Politics | union minister of state for home ajay kumar mishra on ncp sharad pawar ajit pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | वारजे माळवाडी येथील सराईत गुन्हेगार कार्तिक इंगवले व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 6 वी कारवाई

Satyajit Tambe | सत्यजित तांबे यांना सपोर्ट करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस