Maharashtra Politics | नागपुरात शिवसेनेच्या ठाकरे गटावर ओढावली विभागीय कार्यालय रिकामे करण्याची नामुष्की?; जाणून घ्या नेमके कारण…

0
1320
Maharashtra Politics | vacate the office thakre group no money to pay rent electricity bill nagpur
File Photo

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Politics | नागपूर येथील गणेशपेठ बसस्थानक परिसरात असलेले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shivsena Thackeray Group) विभागीय कार्यालय वीजबिल, थकित भाडे यामुळे रिकामे करण्यात आल्याबाबतची चर्चा आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधान आले आहे. त्यावर पाच वर्षाचा भाडेकरार संपुष्टात आल्याने हे कार्यालय रिकामे करण्यात आल्याचे ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. (Maharashtra Politics)

 

नागपूरातील गणेशपेठ परिसरात उद्योगपती किशोर राय यांच्या मालकीच्या रजत संकुल इमारतीमध्ये शिवसेनेचे विभागीय कार्यालय होते. तानाजी सावंत (Tanaji Sawant) संपर्कप्रमुख असताना या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या कार्यालयातून अनेक संपर्कप्रमुखांनी याच कार्यालयातून शिवसेना पक्षाला विदर्भात उभारी देण्याचा प्रयत्न केला. आता शिवसेनेच्या ठाकरे गटावर हे कार्यालय बंद करण्याची नामुष्की ओढावली आहे. ‘तानाजी सावंत संपर्कप्रमुख असताना भाडेतत्वावर आम्ही हे कार्यालय घेतले होते. आता तो करार संपला आहे. त्यामुळे चार महिन्यांपूर्वीच आम्ही हे कार्यालय रिकामे करून दिले आहे. बिल्डींग मालकाला त्याच्या वैयक्तिक कामाकरीता ते कार्यालय रिकामे करून हवे असल्याकारणाने आम्ही ते रिकामे करून दिले.’ अशी माहिती ठाकरे गटाचे प्रवक्ते नितीन तिवारी (Nitin Tiwari) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

 

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांना केंद्रस्थानी ठेवत विविध राजकीय पक्षांमध्ये पदाधिकारी तसेच कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.
त्यातच उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा (BJP) मोठा नेते अद्वय हिरे (Advay Hire) यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
त्यामुळे भाजपला उत्तर महाराष्ट्रात धक्का बसला असून शिवसेनेची पकड मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.
नुकतचं काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत सेनेचे शिवबंधन बांधले.

 

 

Web Title :- Maharashtra Politics | vacate the office thakre group no money to pay rent electricity bill nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा