Maharashtra Politics | ‘राष्ट्रवादीची ‘ही’ खेळी सेनेवर दबाव टाकण्यासाठी होती का?’, शिंदे गटाच्या नेत्याचा परखड सवाल

0
632
Maharashtra Politics | was pawar move to end shivsena shinde group leader naresh mhaske question to jayant patil
file photo

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | पहाटेच्या शपथविधीची (Swearing in) खेळी जाणीपवूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट (President’s Rule) उठवण्यास मदत झाली. तसेच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी भक्कम झाली, असे खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही खेळी (Maharashtra Politics) मग तेव्हा शिवसेनेवर (Shivsena) दबाव टाकण्यासाठी होती का? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shiv Sena) गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (spokesperson Naresh Mhaske) यांनी केला आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यावर बाळासाहेबांची शिवसेनेनं आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पहाटेच्या शपथविधी पवारांची खेळी होती तर मग ती शिवसेनेवर प्रेशर टाकीत होती का? अजित पवारांच्या (Ajit Pawar) मागे कायमचा गद्दार आणि बंडखोर बिरुदावली लावण्याकरता ती खेळी होती का? आताची जी आघाडी केली ती सुद्धा बाळासाहेबांचा विचार संपवण्यासाठी केली का? असा परखड सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला.

जयंत पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) म्हणाले, जयंत पाटलांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या नेत्याच्या मनामध्ये काय होतं हे मी कसं सांगेन. प्रत्येक पक्षाने कसं काम करायचं, कोणासोबत युती करायची. एका दिवसात कसा शपथविधी करायचा कोणाला धक्का कसा द्यायचा किंवा नाही द्यायचा हे काही महाराष्ट्रात (Maharashtra Politics) नवीन नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक धक्के झाल्याचे सत्तार म्हणाले.

Web Title :- Maharashtra Politics | was pawar move to end shivsena shinde group leader naresh mhaske question to jayant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | PMPML च्या पिंपरी आगारातील बेंच फिटरने बनवले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर, तीन दिवसांत निर्मिती

Nilesh Rane On Aaditya Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावरून निलेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांना सुनावले; म्हणाले…

Pune News | ‘समाजाप्रती आमच्या जबाबदाऱ्या’ यावर मोती मस्जिदमध्ये सुसंवाद, समर्थ पोलिसांचा चांगला उपक्रम