CM फडणवीस – DyCm पवार यांना सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोणत्याही विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदाची शपथ दिल्यानंतर राज्यपाल बहुमत सिद्ध करण्यासाठी निश्चित वेळ देतात. साधारणपणे हा अवधी 14 दिवसांचा असतो. फडणवीस आणि पवार यांचं सरकार स्थापन झालं आहे त्यामुळे बहुमताच्या चाचणीशिवाय हे सरकार बरखास्त होऊ शकणार नाही. मात्र बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी नक्की किती मुदत दिली आहे याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी काल मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत 30 नोव्हेंबरपर्यंत बहुमत सिद्ध करणार असल्याचं सांगितलं होतं, मात्र आज भाजपचे कोणीच नेते राज्यपाल किंवा राजभवनाकडून बहुमत सिद्ध करण्यासाठी निश्चित मुदत दिलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे . भाजपचे वकील मुकुल रोहतगी यांच्या या युक्तिवादात राज्यपालांनी फडणवीस-पवार सरकारला 14 दिवसांची वेळ दिल्याचा खुलासा युक्तिवादादरम्यान झाला. 14 दिवस म्हणजे 6 डिसेंबरपूर्वी नव्या सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. मात्र सभागृहात बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिलेली 14 दिवसांची मुदत योग्य आहे की सर्वोच्च न्यायालय उद्या त्यामध्ये काही बदल करतं ते पाहावं लागेल.

सर्वोच्च न्यायालय उद्या निकाल देणार –

भाजपानं सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हानं दिलं होतं. या याचिकेवर दोन दिवस सुनावणी झाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निर्णय राखून ठेवला असून, यावर उद्या (26 नोव्हेंबर) निर्णय येण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com