औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | भाजपच्या (BJP) माजी मंत्री आणि महिला नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. पक्षाकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. नुकतेच पकंजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला दांडी ( Maharashtra Politics) मारली होती. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे (Former MP Chandrakant Khaire) यांनी मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर त्यांचं आम्ही स्वागत करु, असं खैरे यांनी म्हटलं आहे. खैरे यांनी अप्रत्यक्षपणे त्यांना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर दिली आहे. या ऑफर नंतर पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले, गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या परिवाराकडे ( Maharashtra Politics) दुर्लक्ष करण्याचे काम भाजप नेत्यांकडून सुरु आहे. मी इथे स्पष्ट सांगतो की, सध्या पंकजा मुंडे यांना दूर करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) किंवा इतर कोणत्या नेत्याने त्यांना दूर केलं असेल, असे खैरे म्हणाले.
सध्या भाजपमध्ये मुंडे कुटुंबाला डावलण्याचे काम केले जात आहे, हे दिसत आहे.
त्यामुळे पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचं स्वागत करतो.
पण त्यांना पक्षात घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आहे.
उद्धव ठाकरे यांनी पंकजा यांना बहीण मानलं आहे.
त्यामुळे त्यांना ठाकरे गटात घेण्यास काहीच हरकत नसल्याचे चंद्रकांत खैरे म्हणाले.
ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
Web Title :- Maharashtra Politics | will pankaja munde leave bjp and join shivsena uddhav balasaheb thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Nashik Graduate Constituency | अखेर काँग्रेस पक्षाकडून सत्यजीत तांबे यांचे निलंबन
Pune Crime News | पुण्यात मांजामुळे दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी, रुग्णालायत उपचार सुरु
Nana Patole | ‘बेईमानी करुन दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपला..’, नाना पटोलेंचा इशारा