Maharashtra Politics | ‘उद्धव ठाकरे, तुम्ही राहुल गांधी यांना जोड्याने मारायला निघाला होता, पण, मिठी मारून’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics | काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आली आहे. त्यांच्या यात्रेला महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) नेते हजेरी लावत आहेत. त्यामुळे भाजप त्यांना डिवचत आहे. तसेच राहुल गांधी यांनी देखील वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाली आहे. त्यावरुन त्यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लक्ष केले आहे. उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) तुम्ही राहुल गांधींना जोड्याने मारायला निघाला होता, पण, मिठी मारून आलात, असे भाजपने म्हंटले आहे. (Maharashtra Politics)

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेच खऱ्या अर्थाने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेत आहेत, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते. त्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली होती. त्या टीकेला भाजपने उत्तर दिले आहे. भाजपने आपल्या अधिकृत ट्वीट हँडलवरुन उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्वीट केला आहे. त्यात ते राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. तसेच दुसरीकडे भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे राहुल गांधींना मिठी मारत आहेत. (Maharashtra Politics)

अकोल्याच्या सभेत राहुल गांधी म्हणाले, माझ्याकडे सावरकरांचे पत्र आहे. त्यात त्यांनी इग्रजांची माफी मागितली आहे.
त्यात त्यांनी इंग्रजांचा सेवक होण्याची विनंती केली होती. उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
आणि सरसंघचालक (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी ते पत्र पाहावे.
सावरकरांनी इंग्रजांना मदत केली होती. त्यांना त्यांच्याकडून पेन्शन मिळत होती. त्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे.
शिवसेना स्वत: ला हिंदुत्वावादी म्हणवते. मग ते सावरकरांचा अपमान कसा काय सहन करतात, असा प्रश्न भाजपने शिवसेनेला टाकला आहे.
उद्धव ठाकरे यांनी एका ठिकाणी मी राहुल गांधींच्या मताशी सहमत नाही, असे म्हंटले आहे.

 

Web Title :- Maharashtra Politics | you were going to hit rahul gandhi with a shoes but came with a hug bjps reply to uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maha Vikas Aghadi | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पदवीधर सिनेट निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

Pune PMC – PM Awas Yojana | पंतप्रधान आवास योजना बंद झाल्याने यापुढील काळात या योजनेअंतर्गत नवीन प्रकल्प नाही

BMC Elections | BMC च्या प्रभागाच्या संख्येवरून आता पालिका आणि राज्य निवडणूक आयोग नोंदवणार जबाब; उच्च न्यायालयाचे याचिका सुनावणीवेळी आदेश