विधानसभा 2019 : ‘या’ जागेवर ज्या पक्षाच्या उमेदवारानं विजय मिळवला, ‘त्यांचं’ बनलं नाही सरकार, 40 वर्षांपासूनची ‘अंधश्रद्धा’

चंद्रपूर : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु असून सर्वच पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून अनेक ठिकाणी काही उमेदवारांनी बंडखोरी केली आहे. प्रचाराला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असून सोमवारी विधानसभेसाठी मतदान पार पडणार आहे. मात्र यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघावर कधीही कोणत्याही एकट्या पक्षाचे वर्चस्व राहिलेले नाही.

काँग्रेस, जनता दल, शिवसेना, भाजप या सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी याठिकाणी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवाराला देखील येथील जनतेने सभागृहात पाठवले आहे. मात्र या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी मागील 40 वर्षांपासून ज्या पक्षाच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे, त्या पक्षाला कधीही सत्ता मिळालेली नाही.

1962 मध्ये हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला. त्यावेळी काँग्रेसच्या गोविंद मेश्राम यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 1962 पासून हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी ओपन झाला. 1962 पासून 1978 पर्यंत याठिकाणी काँग्रेसचा दबदबा होता. बळीराम गुरपुडे हे काँग्रेसचे आमदार दोन्ही वेळी विजयी झाले होते. 1980 मध्ये अपक्ष उमेदवार बाबासाहेब खानोरकर यांनी काँग्रेसच्या अब्दुल धमानी यांचा पराभव केला होता.

1985 मध्ये बाबासाहेब खानोरकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत बंडखोर उमेदवार श्रीराम भोयर यांना पराभूत केले होते. त्यानंतर 1990 मध्ये शिवसेनेच्या नामदेव दोनाडक यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 1995 मध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून बाबासाहेब खानोरकर हे रिंगणात उतरले. त्यांनी भाजपच्या वासुदेवराव पाथोड़े यांचा पराभव केला. 1999 मध्ये भाजपच्या उद्ववराव शिंगाडे यांनी याठिकाणी बाजी मारली.

2004 मध्ये भाजपच्या प्रा. अतुल देशकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दामोदर मिसार यांचा पराभव केला. तर 2009 मध्ये प्रा. अतुल देशकर यांनी अपक्ष उमेदवार संदीप गड्डमवार यांचा पराभव केला होता. मात्र 2014 च्या निवडणुकीत विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रा. अतुल देशकर यांचा पराभव केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा विजय वडेट्टीवार येथून रिंगणात असून संदीप गड्डमवार हे शिवसेनेच्या तिकिटावर त्याच्याविरुद्ध उतरले आहेत.

राष्ट्रवादीकडून कोण लढले –
काँग्रेसबरोबर केलेल्या आघाडीनंतर हि जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आली. त्याठिकाणी 2004 मध्ये पक्षाने दामोदर मिसार यांना उमेदवारी दिली. त्यांना 38734 मते मिळाली होती. तर 2014 मध्ये संदीप गड्डमवार यांना 44878 मते मिळावी होती. मात्र कोणत्याही निवडणुकीत राष्ट्रवादी काँगेसला याठिकाणी विजय मिळवता आला नाही. तसेच जिल्ह्यात देखील त्यांना म्हणावी तशी पकड देखील मिळवता आली नाही.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या