Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro | मध्यरात्री 2 वाजता रोहित पवारांच्या कंपनीवर मोठी कारवाई ! बारामती अ‍ॅग्रो 72 तासात बंद करण्याची सूचना; दोन बड्या नेत्यांवर आरोप

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro | बारामतीमधील बारामती अ‍ॅग्रो या प्लॅन्टवर रात्री दोन वाजता महाराष्ट्र प्रदूषण विभागाने (Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro) कारवाई केली आहे. रोहित पवार यांना रात्री दोन वाजता नोटीस दिली असून 72 तासांत प्लाँट बंद करण्याची सूचना नोटीसीच्या माध्यमातून दिली आहे. रोहित पवारांनी (Rohit Pawar) स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, राज्यातील दोन मोठ्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेवून आज पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या (Maharashtra State Government) एका शासकीय विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. (Maharashtra Pollution Department Notice To Baramati Agro)

युवा मित्रांना एकच सांगू इच्छितो की, संघर्ष करतांना भूमिका घेताना अनेक अडचणींचा सामना करावाच लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत, परंतु अडचणी आल्या म्हणून संघर्ष थांबवायचा नसतो. भूमिका आणि निष्ठा बदलायची नसते ही मराठी माणसाची खासियत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे.

https://x.com/RRPSpeaks/status/1707264539027554605?s=20

रोहित पवार (Rohit Pawar) पुढे म्हणाले, हा लढा मी लढणारच आहे, परंतु ज्यांच्या सांगण्यावरून माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे त्यांना एकच सांगायचंय की, मी आधी व्यवसायात होतो नंतर राजकारणात आलो, परंतु आधी राजकारणात येऊन आणि नंतर व्यवसायात आर्थिकदृष्ट्या बलाढ्य झालेले अनेक जण आहेत. त्यामुळे या नेत्यांना अपेक्षित असलेले काहीही साध्य होणार नाही. तसेच हे द्वेषाचं राजकारण आजच्या पिढीला पटणारंही नाही.

आपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या
कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त ‘गिफ्ट’ दिल्याबद्दल सरकारचे
आभार मानतो, परंतु राज्यातील युवा आणि जनता सरकारला नक्कीच ‘रिटर्न गिफ्ट’ देईल, ही खात्री आहे.

असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी
माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे.
या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही.
न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap News | कॉन्ट्रॅक्टर कडून लाच घेताना तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील लेखापाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात