सरकार बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीनंतरच; … तर राज्यात स्थानिक पक्षांचे महत्व वाढीस लागेल

0
33
maharashtra possibility change government only after municipal elections
File Photo

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काल पाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये टीएमसीचाच झेंडा होता आणि भाजपाला केवळ ३ जागा मिळाल्या होत्या. तर यंदाच्या निकालात टीएमसीने आपला गड राखला आहे मात्र भाजपने भरगोस मुसंडी मारली आहे. तीन वरून ७८ इतक्या जागा मिळवल्या आहेत. तर या निकालावरून महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन कमळ’ मोहीम सुरू होईल, असे सांगणाऱ्या भाजप पक्षाला आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईपर्यंत वाट बघावी लागणार आहे. तोवर राज्यात कोणते बदल होतील असे समोर दिसत नाही.

तसेच, पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारली आहे. ३ पक्षाबरोबर लढताना कोणती रणनीती तयार करायची हे देखील समजली आहे. पंढरपुर पोटनिवडणुकित भाजप पक्षाने एक रणनीति आकत तेथील जागा खेचत आणली आहे. महाविकास आघाडीला एक धक्काच दिला आहे. तिन्ही पक्षाचे सरकार असून सुद्धा भाजपने आपली बाजी मारली आहे. प्रचारादरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवार निवडून आणल्या जाण्याचा निर्धार केला होता. आणि ते सध्या करून दाखवले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचे ठरवले तरीही एकमेकात नाराजीनाट्य उदयास येईल. यांच्या नाराजी नात्यामधून भाजप त्यांची जागा घेऊ शकतो. यावरून पंढरपूर पॅटर्न राबवणे भाजप पक्षाला सोपं होऊ शकतो. असा एक अनोखा राजकीय पायंडा भाजपाने वापरून यश संपादन केले आहे. परंतु, भारत भालके यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली असती तर भाजपाची खेळी यशस्वी झाली असती का असा सवाल सुद्धा उपस्थित होतो.

या निकालावरून बघता आगामी कालावधीत राज्यात स्थानिक पक्षांचे महत्त्व येणार आहे. तर यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोण, कोणाशी, कसे जुळवून घेतो यावर काँग्रेस पक्ष आणि भाजपचे राज्यातील स्थान स्पष्ट होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची वचक आहे. तर राज्यात सत्तेत सुद्धा राष्ट्रवादी आहे. तरी सुद्धा पराभव झाला आहे याचं कारण शोधणे आवश्यक आहे. तर पंढरपूरच्या निकालाने महाविकास आघाडी सरकारला नाहीर; मात्र राष्ट्रवादीला धोक्याची घंटा दाखविली आहे. शरद पवार यांनी दिवंगत भालके यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, असे सुचवले होते. पण राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांनी भालके यांच्या मुलाचे नाव आग्रहाने लावून धरले. भालके यांच्या पत्नीना उमेदवारी दिली नाही. तसेच, सत्ता हाती असली की, राष्ट्रवादीचे नेते जमिनीपासून २ पावले वर चालतात. त्यांना कोणाची आवश्यकता वाटेनाशी होते, हा आजवरचा इतिहास आहे. त्याउलट सत्तेत असताना आणि नसताना भाजप पक्षाचे महाराष्ट्रातील नेते ज्या पद्धतीने सर्वांशी वागतात, तो गुण इतर पक्षांनी नक्कीच घेतला पाहिजे.

यंदा पंढरपूरची शीट जरी भाजपकडे आली असेल तरी, भाजप विस्कळीत आहे. तेथील पूर्वीचे नेते अधिक सक्रिय दिसून येत नाहीत. विविध पक्षामधून भाजप पक्षात आलेल्या नेत्यांची इथे वर्णी लागते. अशी ही अस्वस्थता दूर करणे भाजपचे प्रमुख काम ठरणार आहे. परंतु इथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने अधिक कार्यक्षम होण्याची आवश्यकता आहे. परंतु या तिन्ही पक्षाचा संयम त्यांनाच संकटात पाडू शकतो. तसेच भाजपचे प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते, देवेंद्र फडणवीस, अमित शहा अथवा मी आम्ही तिघांपैकी कोणीही महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होईल, असे अधिकृतपणे बोललेलो नाही. महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या अंतर्गत विरोधातून पडेल. लोकांच्या मनात राग आहे. असे ते म्हणालें,

दरम्यान, या सर्व निकालाच्या घडामोडीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आम्ही तिन्ही पक्ष एकत्र व मजबूत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात लगेच काही वेगळे घडेल या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. जर भाजपने फोडाफोडी केली तर महाराष्ट्रातील जनता त्यांचा रोष दाखवून देईल. कोरोनाची साथ असल्यामुळे आम्ही संयमाने वागत आहोत. तर नवाब मलिक म्हणतात, देशातील निकालामुळे महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. जी भाजप प्लासीच्या लढाईत पराभूत झाली तिने सह्याद्री जिंकण्याची स्वप्न बघू नयेत. असे त्यांनी म्हटले. तसेच, शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हणाले, पंढरपूरमध्ये स्थानिक गणिते होती. उमेदवारीविषयी काही वेगळे मतप्रवाह होते. त्यामुळे एक विधानसभेची जागा जिंकली, म्हणजे महाराष्ट्राचे गणित बदलेल. तीच पद्धत सगळीकडे वापरली जाईल, असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे.