Maharashtra Pre Monsoon Rain | राज्यात आगामी 4 दिवस ‘धो-धो’ पाऊस; मुंबई, कोल्हापूरसह ‘या’ 13 जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Pre Monsoon Rain | राज्यात सध्या पावसाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या चार ते पाच दिवसामध्ये कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील काही ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने झोडपून काढले. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. आता आगामी 4 दिवस पुन्हा पाऊस (Maharashtra Weather Forecast) बरसणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) सांगण्यात येत आहे. कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli), पालघर (Palghar), मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), यवतमाळ (Yavatmal), अहमदनगर (Ahmednagar) या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Pre Monsoon Rain)
हवामान खात्याच्या अंदाजानुसार (IMD), कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत आगामी 4 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राजस्थानच्या उत्तर पूर्व भागापासून ते उत्तर पूर्व अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
त्याचबरोबर उत्तर पूर्व राजस्थान ते बंगालच्या उपसागरापर्यंत उत्तर प्रदेश पार करून हवेच्या वरच्या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Pre Monsoon Rain)
—
24/05:
Mumbai today early morning hours reported light drizzle at few places …
It happened yesterday too…
With higher humidity levels >70-80%, and night temperatures comparatively lower, its possible….— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 24, 2022
राज्यातील कोकण, विदर्भ आणि कोल्हापूरसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात आगामी 4 दिवस पाऊस पडणार आहे.
बंगालच्या उपसागरासह अंदमानला दाखल झालेला मान्सून मागील 3 दिवसांपासून अनुकूल स्थितीच्या अभावामुळे अजूनही पुढे सरकू शकलेला नाही.
दरम्यान, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडा आधी 22 मे ऐवजी 15 मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर (Andaman And Nicobar Islands) पोहोचला.
आता केरळात 27 मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत 5 ते 6 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
तसेच, मान्सूनचा आतापर्यंत प्रवास चांगला राहिल्यामुळे 20 ते 22 मे रोजी मुंबईत मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यानं (Indian Meteorological Department-IMD) सांगितलं आहे.
Web Title :- Maharashtra Pre Monsoon Rain | Mumbai Kolhapur Sangli Palghar Thane Raigad Ratnagiri Sindhudurg Dhule Nandurbar Jalgaon Yavatmal Ahmednagar Konkan And Vidarbha Receive Heavy Rain Alert For Next Four Days
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update