Maharashtra Pre Monsoon Rain Update | राज्यात आगामी 3 दिवस पावसाची ‘रिमझिम’ – हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Pre Monsoon Rain Update | हवामानाच्या अंदाजानुसार सध्या मान्सून लांबणीवर पडला आहे. दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी पावसाची परिस्थिती दिसून येत आहे. त्याचबरोबर काही भागात पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. तर हा मान्सून नसून मान्सूनपूर्व पाऊस (Maharashtra Pre Monsoon Rain Update) असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून Indian Meteorological Department (IMD) सांगण्यात येत आहे. आता राज्यात आगामी तीन दिवस ढंगाचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा (Maharashtra Monsoon) अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

हवामानाच्या सांगण्यावरून, कोकण (Konkan) आणि गोवा (Goa) पट्टय़ामध्ये 28 मेपर्यंत काही भागामध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आता जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये (Kerala) दाखल होतील. त्यानंतर कोकणमार्गे महाराष्ट्र आणि मुंबई (Mumbai) परिसरात हे वारे पोहोचतील. अशी माहिती हवामान खात्याने सांगितलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी मान्सून दाखल झाला. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली होती.
त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मान्सून काही दिवस लांबणीवर पडला असल्याचं सांगितलं जात आहे.
तसेच, प्रतिकूल स्थितीमुळे मान्सून श्रीलंकेच्या किनारपट्टीसह परिसरात अडकला आहे.
मान्सूनचे वारे 27 मे रोजी भारतात दाखल होणार असल्याची शक्यता आहे.

 

Web Title :- rainshowers pre monsoon rain update mumbai maharashtra konkan

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा