Maharashtra Primary Schools Reopen | राज्यातील 1 ली ते 5 वी पर्यंत शाळा सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या प्रमुखांचे मोठं वक्तव्य, म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Primary Schools Reopen | राज्यात कोरोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरली आहे. राज्यातील शहरी भागात 8 वी ते 12 आणि ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. त्यानंतर आता राज्यात 1 ली ते 5 वी शाळा (Maharashtra Primary Schools Reopen) सुरु होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पहिलीपासूनचे वर्ग सुरु करण्यास शालेय शिक्षण विभागही (School Education Department) अनुकूल असल्याची माहिती समोर आली. मात्र, कोरोना टास्क फोर्स कडून (Corona Task Force) राज्यातील 1 ली ते 5 वी शाळा सुरु करण्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक (Dr. Sanjay Oak) यांनी याबाबत खुलासा केला आहे.

 

राज्याच्या शालेय शिक्षण विभाग जरी पहिली ते पाचव्या वर्गापर्यंतच्या शाळा सुरू (Maharashtra Primary Schools Reopen) करण्याबाबत अनुकूल असले तरी या वर्गांच्या शाळा सुरु करण्याची ही योग्य वेळ नाही. पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्यास टास्क फोर्स अनुकूल नाही. तसंच विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण (Vaccination) झाल्याशिवाय शाळा सुरु करणं योग्य होणार नाही, असं मत डॉ. ओक यांनी व्यक्त केले आहे.

 

काय म्हणाले डॉ. संजय ओक?

मुलं जवळपास 18 महिने शाळा बाहेर आहेत आणि याच्या दुष्परिणामांची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु लहान मुलं कोविडला बळी पडणार नाहीत याची काळजी टास्क फोर्सला आहे. म्हणूनच पीडियाट्रिक व्हॅक्सिनेशन (Pediatric vaccination) सुरु व्हावे यासाठी सोमवारच्या मिटिंगमध्ये टास्क फोर्स राज्य सरकारला (State Government) विनंती करणार आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करणं योग्य ठरणार नाही, असं डॉ. संजय ओक म्हणाले.

 

… तर तिसरी लाट येऊ शकते
डॉ. ओक म्हणाले, मास्क ही पहिली लस आहे, पण सणात लोकांनी मास्क टाळला, यामुळेच तिसरी लाट येणारच नाही असं म्हणता येणार नाही.
अमेरिकेत मुलांचं बाधित होण्याचे प्रमाण एवढं वाढलं आहे की, मुलांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात शिफ्ट केले जात आहे.
ही परिस्थिती मला माझ्या राज्यात येऊ द्यायची नाही.
तिसऱ्या लाटेचा अंदाज चुकल्याचा आनंद मला आहे. मात्र, तिसरी लाट येणारच नाही असं म्हणता येणार नाही.

 

केंद्राने लहान मुलांचे लसीकरण सुरु करावं
शाळा लवकरात लवकर सुरु करायच्या असतील तर लहान मुलांचं लसीकरण सुरु होणं गरजेचं आहे.
त्यामुळे सरकारनं लहान मुलांचं लसीकरण सुरु करावं, असंही डॉ. संजय ओक म्हणाले.

 

Web Title :- Maharashtra Primary Schools Reopen | conditions are not suitable to reopen schools for 1st to 5th class in maharashtra said task force head Dr. Sanjay Oak-marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sofia Urista | धक्कादायक ! Live प्रोग्राममध्ये ‘या’ गायिकेनं चक्क पुरुष चाहत्याच्या तोंडावर केली ‘लघुशंका’

Pune News | पुण्यात रविवारी राज्यस्तरीय उच्चशिक्षित लिंगायत वधू-वर पालक परिचय मेळावा

Vitamin Deficiency | ‘या’ Vitamin च्या कमतरतेमुळे वाढतो हृदयाचा धोका ! हाडे होतात कमजोर, ‘हे’ खाल्ले तर मिळेल जबरदस्त फायदा