Maharashtra Primary Schools Reopen | ‘पहिलीपासून शाळा सुरु होणार, पण…’, राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Primary Schools Reopen | राज्यात 11 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत (Corona) आहे. राज्यात 1 हजार 711 मुलं कोरोनाबाधित आढळून आली आहेत. अलीकडच्या 20 दिवसांतील ही आकडेवारी आहे. मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या मुलांचे तातडीने लसीकरण (Vaccination) होणे आवश्यक असल्याचे टास्क फोर्सचे ही (Task Force) मत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली. तसेच लहान मुलांचे लसीकरण आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस (Booster dose) देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे (Union Health Minister) केली असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. ते जालन्यात बोलत होते. (Maharashtra Primary Schools Reopen)

 

दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच (School Reopen) वर्ग सुरु करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. त्यामुळे 5 वी पासून पुढील वर्ग आधीच उघडले असून 1 ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र (No Objection Certificate) देण्यात आलं आहे. याबाबत आता मुख्यमंत्री (CM) निर्णय घेतील अशी माहिती राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

 

15 डिसेंबर पर्यंत पहिल्या डोसचं लसीकरण पूर्ण

राज्यात नोव्हेंबर अखेर पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याच टार्गेट ठेवण्यात आलं
असून जास्तीत जास्त 15 डिसेंबर पर्यंत पहिल्या डोसचं लसीकरण (First dose vaccination)
पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच राज्यात चिकन गुनियाचे (chicken guinea)
प्रमाण वाढत असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
तसेच आरोग्य विभागाला देखील उपाययोजना करण्याच्या सूनचा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- Maharashtra Primary Schools Reopen | physical classes for standards 1 to 4 in maharashtra soon Maharashtra Primary Schools Reopen rajesh tope jalna marathi news policenama

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा