Maharashtra Prison Department | आता विद्यार्थ्यांना संशोधनासाठी कारागृहाचे दार खुले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Prison Department | एखाद्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण जीवन बंदिस्त केले जाणार्‍या कारागृहाच्या आतील जीवनाबद्दल सर्वांनाच कुतुहल असते. लोखंडी दरवाजाआड ते बंद असल्याने आतापर्यंत आतील गोष्टी फारशा बाहेर येत नव्हत्या की, तेथील कैद्यांच्या स्थितीची माहिती बाहेर येत नव्हती. आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध बाबींवर कारागृहातील जीवनाचा संशोधासाठी अभ्यास करता येणार आहे. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. (Maharashtra Prison Department)

 

राज्यातील अनेक विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनात मानवाच्या वागणुकीचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक संशोधनाचा वापर केला जातो. सामाजिक संशोधन हा एक कठीण विषय आहे. कोणीही मानवी वर्तनाबद्दल अंदाज लावू शकत नाही. परंतु, सामाजिक संशोधनामुळे मानवी व्यवहार आणि समाजाच्या संदर्भात बर्‍याचा गोष्टींचा उहापोह होऊ शकतो. त्या करीता विविध विद्यापीठातील व महाविद्यालयातील विद्यार्थी विशेषत: लॉ तसेच एमएसडब्ल्यु अभ्यासक्रमांच्या संबंधित शैक्षणिक कारणास्तव कारागृहाला भेट द्यावी लागते. विविध विषयांवर राज्यातील तसेच देशातील विद्यापीठामार्फत संशोधन करण्यात येते़ कारगृहातील कैद्यांवर देखील संशोधन करण्यासाठी विद्यार्थी हे आपला संशोधन विषय निवडत असतात. त्याकरीता त्यांना कारागृहाची भेट तसेच तेथील कैद्यांची माहिती आवश्यकता भासत असते. (Maharashtra Prison Department)

हे लक्षात घेऊन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी नोंदणीकृत संस्था व विविध विद्यापीठ, महाविद्यालयातील विद्यार्थी यांना संशोधनाकरीता कारागृह भेटीची परवानगी देण्याबाबतचे आदेश काढले आहेत. कारागृह विभागासाठी आक्षेपार्ह असलेला विषय वगळता इतर बाबींवर संशोधन करता येणार आहे. त्यासाठी अटींवर परवानगी देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील जास्तीतजास्त ३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारणास्तव कारागृह भेटीची परवानगी देखी देण्याचे आदेश देण्यात आले आहे.

 

त्यामुळे कारागृहातील कैद्यांच्या मानसिक आयुष्यावर संशोधन होणार असून त्यातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे. या संशोधनाद्वारे कैद्यांच्या समस्या, मानसिक स्थितीचा अभ्यास आदींबाबत अभ्यास करता येणार आहे. यामुळे देखील संशोधकांना एका नवीन विषयाचे ज्ञान प्राप्त होणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्था व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे हे देखील कैद्यांवर संशोधनात्मक अभ्यास करणार आहेत.
महाराष्ट्रातील कैद्यांना भेडसावणार्‍या आव्हानांवर, विशेषत: भावनिक आणि मानसिक आरोग्याबाबत तपशीलवार संशोधन महाराष्ट्र कारागृह विभागाच्या समन्वयाने करण्यात येणार आहे.
यामुळे समस्येचा शोध व नवीन ज्ञानाची निर्मिती होणार आहे.
यामुळे कारागृहाच्या सकारात्मक बाबी देखील समाजासमोर येतील.
अश्याप्रकारच्या संशोधनामुळे प्राप्त होणार्‍या अहवालामुळे सुधारणात्मक बदल घडण्यास मदत होईल,
या संशोधनामुळे कैद्यांच्या समस्या तसेच विविध पैलूंवर प्रकाश टाकता येणार आहे.

 

Web Title :- Maharashtra Prison Department | Now the doors of the prison are open to the students for research

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar | देशात सरकार बदलण्याचा मूड, आगामी बदलांसाठी ‘ही’ गोष्ट अनुकूल; शरद पवारांचं मोठं विधान

Pune PMPML News | फुकट्या प्रवाशांना पीएमपीएमएलचा दणका, दंडाच्या रक्केम मोठी वाढ

PMPML | पीएमपीएमएलच्या ‘तेजस्विनी’ बसमधून महिलांना मोफत प्रवास, 8 मार्च पासून बससेवा पुर्ववत