मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Public Holiday | भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे (Lata Mangeshkar passes away) दुखवटा म्हणून राज्य सरकारने (Maharashtra Thackeray Government) सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी (Maharashtra Public Holiday) जाहीर केली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 6, 2022
यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत (Notification) म्हटले आहे की, आज रविवार दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दु:खद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली (Tribute) वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 (सन 1991 चा अधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास (Maharashtra Government) सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
Maharashtra Government has declared a public holiday for tomorrow (February 7) to mourn the demise of Bharat Ratna Lata Mangeshkar: CMO
— ANI (@ANI) February 6, 2022
गानसम्राज्ञी भारतरत्न (Bharat Ratna) लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झालं. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीला रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते.
Web Title :- Maharashtra Public Holiday | Maharashtra Thackeray Government has declared a public holiday for tomorrow (February 7) to mourn the demise of Bharat Ratna Lata Mangeshkar CMO
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update