Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | छत्रपती संभाजीनगर शहरातील उड्डाणपुलांची कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होणार – मंत्री रवींद्र चव्हाण

मुंबई : Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत. 90 टक्के कामे पूर्णत्वाकडे गेले आहेत. मंजूर आराखड्यानुसार काम पूर्ण केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही पुलांची कामे एप्रिल महिनाअखेर पर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री चव्हाण (Maharashtra PWD Minister Ravindra Chavan) म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर शहरात जुन्या बीड बायपास (Beed Bypass, Aurangabad), स्वामी हंसराज तीर्थ चौक यासह विविध ठिकाणी कामे सुरु आहेत. स्वामी हंसराज तीर्थ चौकात बायपासच्या नव्या पुलाखालून अस्तित्वात असलेल्या जुन्या रस्त्याची उंची कमी ठेवल्याची तक्रार होती. मात्र, ही उंची 5.50 मीटर इतकी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सध्या या कामांपैकी 13 किलोमीटरच्या रस्त्यांच्या कामांपैकी 11 किलोमिटरचे काम पूर्ण झाले आहे
तसेच 4.75 कि.मी. चौपदरीकरण कामांपैकी अडीच कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे.
एकूण तीन उड्डाणपुलापैकी एक उड्डाणपूल पूर्ण झाला असून उर्वरित दोन्ही कामे एप्रिल महिनाअखेरपर्यंत
पूर्ण होतील, अशी माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली.
Web Title :- Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | Flyover works in Chhatrapati Sambhajinagar city will be completed by the end of April – Minister Ravindra Chavan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update