Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | पुणे जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे त्वरेने करावीत; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

मुंबई : Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | पुणे जिल्ह्यातील हायब्रीड अ‍ॅन्युईटी (Hybrid Annuity Model) कार्यक्रमांतर्गत पीएन-२४ आणि पीएन-२५ या रस्त्यांच्या प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मात्र ही कामे ठेकेदार संथ गतीने करीत असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधी करीत आहेत. प्रलंबित रस्त्यांच्या कामाला गती देऊन मे महिन्याच्या अगोदर सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Maharashtra PWD Minister Ravindra Chavan) यांनी दिले.

पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना (Tourist Places In Pune District) जोडणाऱ्या रस्त्यांमध्ये सुधारणा करण्याबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री चव्हाण बोलत होते. बैठकीला आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), संग्राम थोपटे (MLA Sangram Thopte), संजय जगताप (MLA Sanjay Jagtap), सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे (Sadashiv Salunkhe PWD), मुख्य अभियंता अतुल चव्हाण (Chief Engineer Atul Chavan), अधीक्षक अभियंता बहिर (Superintending Engineer Bahir), कार्यकारी अभियंता अजय भोसले (Executive Engineer Ajay Bhosale) यांच्यासह रस्ते ठेकेदार, अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चव्हाण (Maharashtra PWD Minister Ravindra Chavan) यांनी सांगितले की, रस्ते कामातील अडचणीसंदर्भात अधिकारी-लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी करून मार्ग काढावा. अचडणी तातडीने सोडवून रस्ते कामांना गती द्यावी. सामान्य जनतेसाठी रस्ते महत्त्वाचे आहेत. रस्त्यांची वर्दळ, अपघातात वाढ होत असल्याने भूसंपादन सक्तीने करणे अपरिहार्य आहे का हे अधिकाऱ्यांनी तपासून घ्यावे. रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक निधी त्वरीत उपलब्ध करुन दिले जाईल, असेही चव्हाण म्हणाले.

वेल्हे तालुक्यातील (Velhe Taluka) तोरणा किल्ल्याकडे (Torna Fort) जाणारा महाड-मेढेघाट चेलाडी रस्ता,
खानापूर ते पानशेत रस्ता (Khanapur – Panshet Road) , हवेली तालुक्यातील (Haveli Taluka)
सिंहगड किल्ल्याकडे (Sinhagad Fort) जाणारा डोणजे कोंढणपूर-खेड शिवापूर रस्ता आणि पुरंदर
तालुक्यातील पुरंदर किल्ल्याकडे (Purandar Fort) जाणारा रस्ता सासवड-कापूरहोळ या रस्त्यांची
(Saswad-Kapurhol Road) कामे काही तांत्रिक बाबीमुळे काही ठिकाणी झालेली नाहीत.
सासवड गाव ते कापूरहोळ रस्त्यासाठी नवीन निविदा मागवून काम करावे. हे काम ४० दिवसात पूर्ण करावे.
पौड-कोळवन-लोणावळा-कालेगाव २०० मीटर रस्ता डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटचा करावा, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

खानापूर ते पानशेत यादरम्यान आवश्यकता असलेल्या ठिकाणी लहान पुलांची उभारणी १५ दिवसांत पूर्ण करावी.
पुणे-खडकवासला दरम्यान वन जमिनीची समस्या दूर करून नांदेड सिटी ते किरकटवाडी
(Nanded City To Kirkatwadi) फाट्यादरम्यान तीन लहान पूल मंजूर असून त्याचे कामही गतीने
करण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.

Web Title :-  Maharashtra PWD Minister Ravindra Chavan | Pending road works in Pune district should be done expeditiously; Instructions of Public Works Minister Ravindra Chavan

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mukesh Chhabra | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्याबद्दल मुकेश छाबरा यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले….

Beed Crime News | क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादातून पतीकडून पत्नीची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या

Maharashtra Local Body Election | ‘तारीख पे तारीख’, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत सुनावणी पुन्हा पुढे ढकलली