महाराष्ट्राच्या राहुल आवारेची जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी निवड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कझाकस्तान येथे जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा कुस्तीपटू राहुल आवारेची भारतीय संघात निवड झाली आहे. त्याने निवड चाचणी स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात बाजी मारून जागतिक स्पर्धेची पात्रताही निश्चित केली. राहुलने २०१८ मध्ये युवा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले आहे. तसेच कनिष्ठ स्पर्धेतही तो रौप्यपदक विजेता आहे. राहुलसह सुशील कुमारनेही जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली आहे.

मंगळवारी जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पार पडलेल्या निवड चाचणी स्पर्धेत राहुलने ६१ किलो वजनी गटात रवींदरचा ६-२ असा पराभव केला. ही स्पर्धा २०२० च्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याची पायरी आहे.

कुस्ती संघटनेतील राजकारणाचा बळी पडल्यानं राहुलला २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागले होते. त्यानंतर त्यानं २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट येथे राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवले आणि विरोधकांना आपली दखल घेण्यास भाग पाडले. राष्ट्रकुल स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले होते.

भारतीय संघ
राहुल आवारे, सुशील कुमार, रवी दहीया, दीपक पुनिया, प्रवीण, मौसम खत्री, सुमित मलिक, बजरंग पुनिया, करण मोर.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like