Maharashtra Rain | मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain | काल राज्यात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गणरायाच्या स्वागताला पावसाने देखील हजेरी लावली. मागच्या 48 तासात राज्यात उकाडा वाढल्याने पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यातील अनेक भागात विजांसह पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली. आज (दि.1) कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) विजा, मेघगर्जना वादळी वाऱ्यासह (Thunderstorm) पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. तर कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.

 

राज्यातील अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह वळीव स्वरुपाचा पाऊस (Maharashtra Rain) पडत आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा येथे अतिवृष्टी (Heavy Rain) झाली. याठिकाणी 130 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

 

 

दरम्यान राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर,
औरंगाबाद, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपर, भंडारा, गोंदिया,
गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यात कमाल तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे.

 

Web Title :- Maharashtra Rain | mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Rain | पुण्यात पावसामुळे 14 ठिकाणी झाडे कोसळली; गॅस वाहिनी तुटली, 7 ठिकाणी इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटच्या घटना

 

Chadani Chowk | दिल्लीजवळील ट्विन टॉवर जमीनदोस्त करणारी कंपनी पुण्यातील पूल पाडणार

 

Amol Mitkari vs Shahaji Bapu Patil | ‘सोंगाड्या, जॉनी लिव्हर आणि गुरु’, शहाजीबापू आणि मिटकरींमध्ये वार-पलटवार