Maharashtra Rain Update | आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट, विदर्भात यलो अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यातील कोकणासह (Konkan) विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) देखील पावसाची सतत रिपरिप सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. गुरुवारी मुंबईला (Mumbai) तर पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. पुण्यात (Pune) सकाळ-संध्याकाळ पावसाची रिपरिप सुरूच आहे.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Update)

मुंबई-ठाण्यात जोरदार पाऊस

मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. मुंबईत आजही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून (Administration) करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाची प्रणाली विकसित
झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोने आणि चांदीचा भाव काय? जाणून घ्या

Maharashtra Politics News | शिंदे गटातील आमदाराचे विधान; म्हणाले, – “अजित पवार निश्चित मुख्यमंत्री…”

Pune Cyber Crime | कॉसमॉस बँकेप्रमाणे भारती सहकारी बँकेवर सायबर हल्ला ! दुसर्‍या बँकेची 439 कार्ड क्लोन करुन 1 कोटी रुपये हडपले