Maharashtra Rain Update | कोकणासह विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यातील काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांत पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरीय ठाणे (Thane), पालघर (Palghar) जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (शुक्रवार) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार, आजही राज्यातील कोकणसह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भात मुसळधार पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता आहे. आज रायगडसह ठाणे, पालघर, मुंबई, पुणे (Pune Rain) या भागात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सातारा (Ratnagiri And Satara) या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला. सिंधुदुर्गसह कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भात (Vidarbha) पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात ढगफुटीसारखा पाऊस पडला आहे. माणगावातील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांना जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून चालावे लागते. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून निर्मला नदीला पूर आल्याने आजूबाजूची शेती पाण्याखाली गेली आहे.

मराठवाड्यात पावसाला गती

मराठवाड्यातही (Marathwada) मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी,
जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हिंगोलीतील कयाधू नदीला या वर्षात पहिल्यांदाच पूर आला आहे. तसेच विभागातील अनेक महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

Raigad Irshalwadi Landslide | इर्शाळगड येथे बचाव मोहिमेचा दुसरा दिवस; आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू

Asthma In Monsoon | पावसाळ्यात वाढत आहे अस्थमाचा धोका, अशी घ्या काळजी

Pune Crime News | ‘नासा’ला द्रव्य विकण्याच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मागितल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरात शिरुन मारहाण

Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

Today Horoscope | 21 July Rashifal : मिथुन, सिंह आणि कुंभ राशीवाल्यांच्या प्रतिष्ठेत होईल वाढ, जाणून घ्या अन्य राशींची स्थिती

Manipur Women Violence | मणिपूर मधील महिलांवर झालेल्या निंदनीय घटनेवर बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केला रोष