Maharashtra Rain Update | मुंबईसह परिसरात जोर’धार’ ! आगामी 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात दमदार पावसाने (Maharashtra Rain Update) हजेरी लावली आहे. मुंबईसह (Mumbai) कोकण (Konkan) पुण्यातील (Pune) काही भागात मुसळधार पावसाने दमदार बँटीग केली आहे. मध्य महाराष्ट्रासह (Central Maharashtra) घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, आगामी 24 तासांत मुंबई उपनगरासह कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) वर्तवण्यात येत आहे.

 

रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात मागील तीन दिवस चांगला पाऊस कोसळत आहे. शेतीच्या कामांना वेग आला आहे. तसेच, रायगड (Raigad) जिल्ह्यातही चांगला पाऊस पडत आहे. काल मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला आहे. दरम्यान, आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सर्वत्र ढगाळ वातावरण पहावयास मिळत आहे. (Maharashtra Rain Update)

पश्चिम महाराष्ट्रात सातारा (Satara) जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरु आहे.
पण मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली नाही. पण जो काही पाऊस झालाय त्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्याची कामं करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे परिसरासह कोकण विभागांत मागील दोन दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे,
आणखी 4 दिवस काही भागांत जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे.

 

Advt.

Web Title :- Maharashtra Rain Update | heavy rains expected in mumbai and konkan in next 24 hours monsoon rain maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा