Maharashtra Rain Update | पुढचे 3-4 तास महत्त्वाचे, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यातील हवामानात वारंवार बदल होत आहे. राज्यातील काही जिल्ह्यात कडक ऊन तर काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी (Maharashtra Rain Update) लावली आहे. अशातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढचे 3-4 तास महत्वाचे आहेत. राज्यातील काही जिल्ह्यात वादळी पावसाचा (Stormy Rain) इशारा मुंबई हवामान विभागाने (Mumbai Meteorological Department) दिला आहे.

 

IMD च्या मुंबई विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई उपनगरासह, ठाणे, पालघरमध्ये पाऊस होऊ शकतो. त्याशिवाय सातारा, सोलापूर, रायगड, धाराशिव, लातूर, परभणी, जालना, बीड, पुणे, हिंगोली आणि अहमदनगर या जिल्ह्यात पुढील तीन ते चार तासांत विजांच्या कडकडाटासह व ताशी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आवश्यक असेल तर घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे. (Maharashtra Rain Update)

 

 

 

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) म्यानमार किनाऱ्याजवळ समुद्रसपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तर दक्षिण छत्तीसगड आणि तेलंगणा परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणाली पासून बिहारपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे.

 

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Advt.

पुणे जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर,
आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले आहे.
वादळी वाऱ्याच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकासान झाले असून उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागिरकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

 

 

Web Title :  Maharashtra Rain Update | imd predicts thunderstorm light rainfall in parts of maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा