Maharashtra Rain Update | पुणे, मुंबईसह काही भागात पावसाचा जोर कायम; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस (Maharashtra Rain Update) झाला आहे. काही भागात हलका ते मध्यम पाऊस (Light To Moderate Rain) पडत आहे, तर काही भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईत मागील चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे (Pune), मुंबईसह (Mumbai) काही जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे.

कोकण (Konkan) विभागात आज काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही (Western Maharashtra) मुसळधार पावसाची (Maharashtra Rain Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मराठवाड्यातील (Marathwada) काही जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अद्याप पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी (Farmer) चिंतेत आहेत. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत.

हवामान खात्याच्या (IMD) अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस सुरू आहे. कल्याण डोंबिवलीत (Kalyan Dombivli) काल पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.

जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली असून गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कोंडेश्वर धबधब्याकडे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या बदलत्या निसर्गाचा मनसोक्त आनंद पर्यटक घेत आहेत. कोंडेश्वर मंदिराच्या (Kondeshwar Temple) बाजूला दोन धबधबे असून दरवर्षी पावसाळ्यात या धबधब्याकडे मोठा प्रवाह असतो. त्यामुळे पर्यटकांनी कोंडेश्वर धबधब्याला पसंती दिली आहे. दरम्यान, मुंबईत सुरु असलेला मुसळधार पावसामुळे कांदिवली पूर्वेमधील अशोकनगर परिसरात बाथरुमचा स्लॅब एका घरावर कोसळून 35 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू (Death) झाला. ही घटना काल रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. किशन धुला असे त्यांचे नाव आहे. .

Web Title :  Maharashtra Rain Update | rainfall in many parts of the maharashtra imd

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा