
Maharashtra Rain Update | आगामी 5 दिवस जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – IMD
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | राज्यभर पाऊस सक्रिय झाल्याचं (Maharashtra Rain Update) दिसत आहे. मुंबई (Mumbai), पुण्यासह (Pune) अनेक ठिकाणी मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रीय होत आहे. अशात राज्यासाठी आगामी पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून (Indian Meteorological Department-IMD) देण्यात आला आहे. तसेच, आगामी तीन ते चार तासांत रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणासह (Konkan) घाट परिसर असलेल्या भागांना मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे.
आगामी तीन ते चार तासांत सिंधुदुर्ग (Sindhudurg), ठाणे (Thane), कोल्हापूर (Kolhapur) आणि सातारा (Satara) जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगडलाही (Raigad) याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे. मुंबई, ठाण्यात अंशत: ढगाळ वातावरण असून हलक्या पावसाच्या सरी कोसळतील. यामुळे नागरिकांनाही सावधानतेच्या सूचना दिल्या आहेत. (Maharashtra Rain Update)
दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून (IMD) आगामी 5 दिवस पाऊस राहिल असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या दरम्यान, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली इथे सध्या जोरदार पाऊस सुरू आहे,
यातच पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे.