Maharashtra Rains | पुढील 48 तासात राज्यात बरसणार पावसाच्या सरी, पुण्यासह 11 जिल्ह्यांना IMD चा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील आठवड्याभरापासून राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने (Maharashtra Rains) हजेरी लावली आहे. कालही पुण्यासह घाट परिसरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rainfall) पडला आहे. ऐन हिवाळ्याच्या (winter) दिवसांत अचानक पाऊस पडल्याने घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडाली आहे. पुढील आणखी दोन दिवस राज्यात पावसाची (Maharashtra Rains) स्थिती कायम राहणार आहे. येत्या दोन दिवसांत कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra) आणि घाट परिसरात (Ghat area) अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

11 जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान विभागाने (IMD) आज पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद आणि लातूर या 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. आज सकाळपासून या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार तासात या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार (Thunderstorm) ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

याशिवाय आज मुंबई, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची नोंद झाली असली तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोसळणाऱ्या या अवकाळी पावसामुळे (Maharashtra Rains) रब्बी पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांत ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

उद्याही राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या संपूर्ण कोकण, घाट परिसर आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या गडगडाटासह (Thunderstorm and lightning) जोरदार पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने मंगळवारी (दि.23) पुण्यासह रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या 6 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | another 48 hours of raining in maharashtra imd give yellow alert to Pune, Nashik, Ahmednagar, Thane, Palghar, Ratnagiri, Raigad, Satara, Kolhapur, Osmanabad & Latur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hingoli News | धक्कादायक ! रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी; जवानाचा मृत्यू

EPF कडून निवृत्तीनंतर मिळू शकतात 2.79 कोटी रुपये, मुळ पगाराच्या 24% करावी लागेल गुंतवणूक; जाणून सविस्तर

Airtel Prepaid Tariff Rates | भारती एयरटेलने प्रीपेड टॅरिफमध्ये केली 25% पर्यंत वाढ, जाणून घ्या कधीपासून होणार लागू