Maharashtra Rains | राज्यातील ‘या’ भागात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rains | राज्यातील काही भागांमध्ये थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. परंतु असे असले तरी येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडण्याची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) थंडी कायम आहे. 2 फेब्रुवारीपर्यंत या भागात थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. तर 3 फेब्रुवारीपासून पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे, असेही हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

दरम्यान, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यातील थंडीचा जोर कमी होणार आहे. राज्यातील धुळे (Dhule) येथे 4.8 अंश सेल्सिअस (Degrees Celsius) तापमानाची (Temperature) नोंद करण्यात आली आहे. तर नंदुरबारच्या (Nandurbar) सातपुड्याच्या डोंगरांमध्ये पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. (Maharashtra Rains)

 

राज्यातील प्रमुख शहरातील तापमान
नागपूर 7.9 अंश सेल्सिअस, नाशिक 8.4 अंश सेल्सिअस, गोंदिया 7.8 अंश सेल्सिअस, मालेगाव 8.6 अंश सेल्सिअस, औरंगाबाद 9.2 अंश सेल्सिअस, नांदेड 9.6 अंश सेल्सिअस, अकोला 10.1 अंश सेल्सिअस, परभणी 10.5 अंश सेल्सिअस आणि सोलापूर 11 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | chance of unseasonal rain in some districts of maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा