Maharashtra Rains | बंगालच्या उपसागरात ‘जवाद’ चक्रीवादळ ! किनारपट्टी भागात रेड अलर्ट; पुढील 2 ते 3 तासात पुण्यासह 16 जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह (Maharashtra Rains) दक्षिण भारतात व पूर्व किनारपट्टीवर वातावरणात बदल होत आहे. सध्या बंगालच्या उपसागर (Bay of bengal) परिसरातील हवेच्या कमी दाबाचा पट्टा (Low pressure area) तीव्र झाला असून त्याचे रूपांतर ‘जवाद’ चक्रीवादळात (Cyclone Jawad) झालं आहे. परिणामी राज्यात पुण्यासह 16 जिल्ह्यात पुढील दोन ते तीन तासांत हलक्या ते मध्य स्वरुपाच्या सरी (Maharashtra Rains) कोसळणार आहेत, अशी महिती हवामान खात्याने (IMD) दिली आहे.

 

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या जवाद चक्रीवादळ सध्या हळूहळू ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. त्यामुळे पुढील 6 तास किनारपट्टीवरील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण पुढील सहा तासात या चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. हे चक्रीवादळ उद्या रविवारी दुपारी ओडिशातील पुरी किनारपट्टीला (Puri coastline) धडकणार आहे. दरम्यान, हवामान खात्याने ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या पूर्व किनारपट्टीवरील बंदरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे.

 

NDRF च्या टीम तैनात

किनारपट्टी प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने (Disaster Management Department) सर्व मच्छिमारांना किनारपट्टी भागात परत आणलं आहे. या भागात NDRF च्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरात हवामानात होणाऱ्या हवामान बदलाचा काही प्रमाणात महाराष्ट्रावर (Maharashtra Rains) देखील जाणवणार आहे.

पुण्यासह 16 जिल्ह्यात पावसाच्या सरी
हवामान खात्याने महाराष्ट्रत आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर,
बीड, लातूर, परभणी आणि जालना या 16 जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद केली आहे.
या जिल्ह्यात पुढील दोन ते तीन तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या (Moderate rainfall) सरी कोसळणार आहेत.
उद्यापासून राज्यात पुढील 4 दिवस कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Maharashtra Rains | cyclone jawad in bay of bengal heavy rainfall possibilities in coastal area of andhra pradesh and odisha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Jay Bhanushali | अभिनेता जय भानुशालीसाठी लेक ताराने गायलं गाणं, अतिशय गोड व्हिडीओ तुफान व्हायरल

Ramnath Kovind | रायगडावर हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींचा विरोध ! राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी घेतला मोठा निर्णय

WhatsApp च्या कोणत्याही वाईट मेसेजबद्दल तुम्ही तक्रार कशी कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया