Maharashtra Rains | राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वारा अन् गारपिटीचा तडाखा; पिकांचे नुकसान, विदर्भात वीज काेसळून तिघांचा मृत्यू

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Maharashtra Rains | राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे. यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांना काल (मंगळवारी ) अवकाळीचा फटका बसला. काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या (Maharashtra Rains) सरी कोसळल्या. वादळी वारा आणि गारपिटीच्या (Winds and hailstorms) तडाख्याने काही जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले. विदर्भातील अकाेला, वाशिम, बुलडाणा, नागपूर, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यांना अवकाळी व गारपिटीचा मोठा तडाखा बसल्याने पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले (Crops Were Damaged) आहेत.
या अवकाळीचा फटका पिकांना बसला आहे. अवकाळी व गारपिटीमुळे (Maharashtra Rains) तुरीसह रब्बीतील हरभऱ्यासह इतर पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला. भाजीपाला आणि फळपिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी साेंगून ठेवलेले सोयाबीन भिजले आहे. तसेच, मका, गहू, कांदा पिकाचे देखील नुकसान झाल्याचे दिसते.
दरम्यान, एके ठिकाणी वीज पडून 25 बकऱ्यांचा मृत्यू (Died) झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यात एका शेतकरी तर भंडारा जिल्ह्यात (Bhandara district) वीज काेसळून 1 बालक दुर्दैवी मत्यु (Died) पावले आहे. तसेच, काही ठिकाणी बोराच्या आणि हरभऱ्याच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. दरम्यान,औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे आज (बुधवारी) पावसाची (Rain) शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) दिली आहे.
Web Title :- Maharashtra Rains | hailstorm-untimely blow in some districts three killed vidarbha due power outage damage crops
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Supriya Sule | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे कोविड पॉझिटिव्ह
Ajit Pawar | मुख्यमंत्रीपदाचा चार्ज कोणाला द्यायचा?; अजित पवार म्हणाले..
MSEDCL Padmavati Substation | गुरुवारी पुण्यातील पद्मावती परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा