Maharashtra Rains | राज्यभरात ‘धो-धो’ पावसाची शक्यता, आगामी 2 दिवस पुण्यात ‘हाय अलर्ट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागील चार पाच दिवसांपासून बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा (Maharashtra Rains) जोर वाढला आहे. राज्यात कोकणात पावसाचा जोर कमी झाला असून राज्यातील सर्वत्र पावसाचा (Maharashtra Rains) अंदाज हवामान विभागाकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे. आज (मंगळवार) राज्यातील पाच जिल्हे वगळता सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता (heavy rainfall alert) आहे. परंतु उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मागील आठवड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळला. राज्यासोबत गुजरातलाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यानंतर आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकत आहे. यामुळे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस

आज (मंगळवार) मध्य महाराष्ट्र, कोकण, खानदेश, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow alert) देण्यात आहे. तर पालघर आणि नाशिक या दोन जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange alert) दिला आहे. पुढील 24 तासत पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्बात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान आकाशात विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील 2 दिवसात पुण्यात मुसळधार पाऊस
मागील आठवड्यापासून पुणे शहरासह (Pune City) जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे.
आजही पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज आणि उद्या पुण्यात हवामान खात्यानं यलो अलर्ट दिला आहे.
उद्या राज्यातून जवळपास सर्वच जिल्ह्यांतून पाऊस गायब होण्याची शक्यता आहे.
बुधवारी केवळ नाशिक, पालघर आणि पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Web Titel :- Maharashtra Rains | heavy rainfall alert in maharashtra today imd give yellow alert to pune for next 2 day

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | स्वस्तात घर देण्याच्या बहाण्याने फसवणूक, बड्या बिल्डरसह 5 जणांवर FIR

सुखवार्ता ! SBI बँकेनं केली व्याज दरात कपात; आता होम, ऑटो अन् पर्सनल लोनसह इतर कर्जावरील EMI भरावा लागेल कमी

Delhi Police | दिल्ली पोलिसांचं ऑपरेशन सक्सेस; PAK चा मोठा कट उधळला ! स्फोटकांसह 6 दहशतवाद्यांना केली अटक