Maharashtra Rains | आगामी 3 दिवसात मुंबईसह पुण्यात जोरदार पाऊस ‘कोसळणार’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Maharashtra Rains | मागील दोन आठवड्यापुर्वी पावसाने राज्यात चांगलीच हजेरी लावली होती, हवामानाच्या पोषक वातावरणामुळे पावसाने दमदार गती घेतली होती. त्यांनतर म्हणजे गेल्या आठवड्यात पावसाने 4 ते 5 दिवस विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर आता महाराष्ट्रात (Maharashtra Rains) पुन्हा पोषक हवामानाचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज एकूण 15 जिल्ह्यांना अलर्ट (Indian Meteorological Department) जारी करण्यात आला आहे. आज (सोमवारी) मुंबईसह, पुणे, ठाणे, पालघर, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, उस्मानाबाद, लातूर आणि नांदेड या 15 जिल्ह्यांना मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

आगामी काही दिवसांत बंगालच्या उपसागरातील चक्रीय वाऱ्याची स्थिती तीव्र झाल्यास राज्यात आणखी पावसाची गती वाढणार आहे.
त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) वर्तवण्यात आली आहे.
संबंधित 15 जिल्ह्यांत आगामी काही तासांत वेगावान वा-यासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
आगामी 3 दिवस राज्यात कमी अधिक फरकाने हीच स्थिती कायम राहणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, सध्या मुंबईसह पुणे परिसरात पावसासांठी पोषक हवामान तयार झालं आहे.
आगामी 3 दिवस मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तिन्ही दिवस पुण्याला हवामान खात्याकडून येलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.
तसेच, आज सकाळपासूनच मुंबईसह पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद केली आहे. येत्या काही तासात पावसाला गती येण्याची शक्यता आहे.

 

सध्या पूर्व राजस्थान आणि लगतच्या मध्य प्रदेशाच्या काही परिसरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. तसेच बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगाल-बांगलादेश किनारपट्टीवर चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे आगामी चार ते पाच दिवसांत गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

Web Title : Maharashtra Rains | heavy rainfall alert in mumbai and pune for next 3 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jalgaon Crime | दुर्देवी ! जळगाव जिल्ह्यात 4 जणांचा बुडून मृत्यू; सख्खे भाऊ आणि चुलत भाऊ-बहिणीचा समावेश

Chandrakant Patil | ‘मुश्रीफ यांनी ड्रामा बंद करावा’ – चंद्रकांत पाटील

Punjab New CM | पंजाबचे नवे CM चरणजीत सिंह चन्नी; 2 उपमुख्यमंत्र्यांसह घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ